लोटे /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)
खेड तालुक्यातील घाणेखुंट गावातील महिलांनी व ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च चे आयोजन करीत घातपातामध्ये मृत पावलेली नीलिमा चव्हाण विलास श्रद्धांजली वाहिली. कॅन्डल मार्च काढून प्रशासनाकडे या विकृत प्रवृत्तीच्या नराधम आरोपींना लवकरात लवकर शोधून काढून कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी या वेळेला करण्यात आली.
नीलिमा चव्हाण प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उमटत असतानाच खेड तालुक्यातील खाणेखुंट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना शाखा घाणेखुंट च्या वतीने या प्रकरणातील अज्ञात आरोपींना तात्काळ शोधून काढावे व त्यांना कठोरात कठोर शासन करावे, या मागणीसाठी शेकडो महिला पुरुष व युवक युवतींनी कॅन्डल मार्च काढला. हा कॅन्डल मार्च घाणेखुंट मधील शिवसेना शाखा येथे सुरू होऊन देवळेकर कॉम्प्लेक्स येथे नीलिमा चव्हाण यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या लावून आदरांजली वाहिली. या मूक मोर्चामध्ये घाणेखुंट मधील शेकडो महिला एम.ई.एस. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, एम. ई .एस. आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, तसेच घाणेखुंट मधील युवक युवती, आबालबुद्ध, युवा सेनेचे कार्यकर्ते तसेच रिक्षा संघटनेचे सर्व सदस्य सामील झाले होते.यावेळी अत्यंत शिस्तबद्ध व शांततापूर्ण वातावरणात हा मोर्चा काढून स्वर्गीय नीलिमा चव्हाण हिला आदरांजली वाहिली गेली. या प्रकरणातील विकृत प्रवृत्तीच्या नराधमांना लवकरात लवकर शोधून काढून त्यांना कठोरात कठोर शासन करावे, अशी मागणी पोलीस प्रशासन तसेच शासनाला केली गेली. या मूक मोर्चाचे नियोजन घाणेखुंट शिवसेना शाखा व युवासेना शाखा यांनी केले होते.यावेळी घाणेखुंटचे सरपंच श्री. संतोष उर्फ राजू ठसाळे, माजी सरपंच व शिवसेना तालुका संघटक श्री.अंकुश काते, श्री. उमेश महाडिक, मधुकर धापसे, भार्गव देवळेकर,रवींद्र काते,इत्यादी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.