खांदा काॅलनी/ लोकनिर्माण प्रतिनिधी
खांदा काॅलनीत पनवेल महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. महापालिकाची मुदत संपल्यानंतर लोकप्रतिनिधी (नगरसेवक) निवडणूक जाहीर होण्याची वाट पाहात आहेत. नगरसेवक पद नसल्याने जनतेच्या आरोग्याची काळजी महापालिकेच्या आरोग्य विभागावर आहे. घंटागाडी नियमित सेवा देत आहे परंतु विभागात डास निर्मुलन फवारणी पावसाने विश्रांती घेतल्यावर देखील झालेली नाही. त्यामुळे सध्या खांदाकाॅलनीतील चार आणि पाच सेक्टर मध्ये मलेरिया आणि डेंग्यूची साथ सुरू आहे. पनवेल महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने तात्काळ डास निर्मुलन फवारणी करावी अशी तेथील जनतेची मागणी आहे.