राजापूर /लोकनिर्माण ( सुनील जठार)
अनेक वर्षापासून तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रातून केली जात असणारी मागणी आमदार राजन साळवी यांच्या प्रयत्नामुळे पूर्णत्वास गेली असून सदर राजापूर तालुका क्रीडा संकुल भुमिपूजनळ समारंभ श्री. मनोहर हरी खापणे कॉलेज येथे आमदार डॉ.राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला.
सदर संकुलांनासाठी सह्याद्री परिसर शिक्षण प्रसारक मंडळ,पाचल,राजापूर या संस्थेने रायपाटण येथील ३.८० हे. आर जागा सामंजस्य कराराद्वारे दिली आहे. तालुका क्रीडा संकुल उभारणीकरीता सादर करण्यात आलेल्या रु.१०२.४८ लक्षच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना संचालनालयाच्या दि. २८/०३/२०१३ रोजीच्या पत्रान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती परंतु तालुका क्रीडा संकुल बांधकामाकरीता दोन वेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आली त्यास प्रतिसाद मिळाला नाही.
तालुका क्रीडा संकुल बांधकामाची सुधारीत अनुदान मर्यादा दि. २३ मार्च, २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार रू. १०० कोटीवरून रू. ५.०० कोटी करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम उपविभाग, राजापूर यांच्याकडून क्रीडा सुविधा विकसीत करण्याचे सुधारीत रू. ४,९८,३०,०००/- रकमेचे अंदाजपत्रक तयार करून सुधारीत प्रशासकीय मान्यतेकरीता मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे सादर करण्यात आले होते त्यास दि.२९ डिसेंबर २०२२ रोजी सुधारीत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. तालुका क्रीडा संकुल राजापूर येथील क्रीडा सुविधा विकसीत करण्याकरीता शासनाकडून २ कोटी ५० लक्ष अनुदान प्राप्त झालेले आहे.
सदर समारंभाला आमदार डॉ.राजन साळवी समवेत विधानसभा समन्वयक प्रकाश कुवळेकर, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, महिला उपजिल्हा संघटक दुर्वा तावडे,महिला तालुका संघटक प्राची शिर्के, शिवसहकार तालुका संघटक विलास नारकर, उपतालुकाप्रमुख रामचंद्र सरवणकर, विश्वनाथ लाड,शरद लिंगायत,विभागीय संघटक उमेश पराडकर, विभागप्रमुख वसंत जड्यार, गणेश तावडे, संतोष हातणकर, नंदुकीशोर मिरगुले,ग्राहक संरक्षण कक्ष मंगेश पराडकर,मंगेश पांचाळ,खापणे कॉलेज संचालक मनोजगांगण,पंचायत समिती माजी सभापती सुभाष गुरव, अभिजित तेली, प्रतिक मटकर,वकील बार संघटना अध्यक्ष ऍड शशिकांत सुतार,प्रकाश कातकर अर्बन बँक संचालक, आप्पा साळवी माजी विभाग प्रमुख, सुरेश येणारकर, संदीप बारस्कर,पाचल उपसरपंच आत्माराम सुतार, शाखाप्रमुख महेश ताम्हणकर, रायपाटण पोलीस पाटील श्री.शेट्ये, माधवी पांचाळ,अंजली कडू ,राजा नलावडे माजी सरपंच, पोलीस पाटील शेट्ये,धनजय ताम्हणकर,आणि ठेकेदार पी.जी.सावंत उपस्थित होते