लोटे / लोकनिर्माण ( प्रमोद आंब्रे)
लोटे येथील घरडा केमिकल्स लिमिटेड या कंपनीला फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) कडून राष्ट्रीय स्तरावरील केमिकल विभागामध्ये ३ प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.त्यामध्ये लीडर ऑफ एनर्जी मॅनेजमेंट, एक्सलन्स इन कार्पोरेट एंविरोन्मेन्ट रिस्पॉन्सिबिलिटी आणि कंपनी ऑफ दी इयर या पुरस्कारांचा समावेश आहे.
हा सोहळा दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या उपस्थितीत झाला.
घरडा कंपनीचे साईट हेड आर. सी. कुलकर्णी, एस. डी. पार्थे (सरव्यवस्थापक पर्यावरण), अनिल भोसले (डेप्युटी जनरल मॅनेजर एच. आर), व्ही. बेंजामिन (डेप्युटी जनरल मॅनेजर इलेक्ट्रिकल विभाग) आदींनी पुरस्कार स्वीकारले. विशेष म्हणजे गेल्या वर्षीसुद्धा घरडा कंपनीला तीन पुरस्कार प्राप्त झाले होते.
राष्ट्रीय स्तरावर मोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेत कोकणातील घरडा कंपनीने मानाचे पुरस्कार प्राप्त करून प्रावीण्य मिळवले आहे.