खेड /लोकनिर्माण (काका भोसले)
तालुक्यातील कुडवशी गावचे पोलिस पाटील आणि लोकनिर्माण वृत्तपत्राचे खेड तालुका प्रतिनिधी प्रकाश सिताराम खेडेकर यांच्या मातोश्री पार्वती सिताराम खेडेकर यांचे १७/८/२०२३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ९२ वर्षांचे होते.
त्या मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. त्यांच्या अंत्ययात्रेला मुंबई आणि खेड तालुक्यातून त्यांचे नातेवाईक आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन बहिणी, नातवंडे, पतवंडे असा परिवार असून त्यांचे दशविधी विधी शनिवार दि. २६/०८/२०२३, बारावा विधी सोमवार दि. २८/०८/२०२३ तर उत्तरकार्य (तेरावा विधी) मंगळवार दि. २९/०८/२०२३ राहत्या घरी मु. कुडोशी ता. खेड, जिल्हा रत्नागिरी येथे होणार आहे.