युवकांचे प्रेरणास्थान माननीय श्री युयुस्तू आर्ते प्रेरित(मुंबई ग्रुप) आषाढी एकादशी निमित्त आयोजित पारंपरिक वेशभूषा स्पर्धा २०२३ आयोजन


ठाणे लोकनिर्माण प्रतिनिधी  

युवकांचे प्रेरणास्थान माननीय श्री युयुस्तू आर्ते प्रेरित(मुंबई ग्रुप) च्या वतीने यंदा एकादशी निमित्त आयोजित पारंपरिक वेशभूषा स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १ ते ५ वयोगटातील चिमुकल्यांनी सुंदर अश्या पारंपरिक वेशभूषा सादर करून आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खूप चांगला सामजिक संदेश दिला आहे यातून नक्कीच मोठा बदल घडून येईल ही विठुरायाच्या चरणी प्रार्थना करुया असे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.



संवेदनशिलता खूप मौल्यवान आहे.

सर्वात चांगली लहान मुले शिकऊ शकतात. आपल्या आजूबाजूला असणारे हे मुके पशू देवाचे स्वरूप आहेत. खरा निसर्ग आणि त्याचे घटक त्यांना दिलेलं आधार हीच खरी  देवपूजा. करुणा आणि प्रेम ही अध्यात्मिक मूल्ये स्पर्धक ओवी भोसले हिने तिच्या पारंपरिक वेषभूषेमधून या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचवली. तिच्या या शिकवणीला आपण ही मनापासून खऱ्या अर्थाने संस्कृती जतन करूया.

     तसेच, कुटुंब व्यवस्था कशी असावी आणि त्यांचे प्रत्यक्ष चित्र उभारून आपल्या मुलांना व समजाला माऊली स्वरूपात दर्शन घडून खूप मोलाचा सामजिक संदेश दिला आहे. स्पर्धक स्वराज लोखंडे त्याचे पालक आणि आजी आजोबा याचे अभिंनदन करुन ही कृती आई वडील मुले आणि वरिष्ठ यांच्यातील खरे सबंध कसे असावे हे दर्शवत आहे. आणि आई ही माऊली तीच घडवते आणि तिचेच प्रतिबिंब मुले असतात अशीच मोलाची सांस्कृतिक आणि अध्यात्मिक शिकवण मुलांना लागणं गरजेची आहे. एक सुंदर असा प्रयत्न श्रीशा व आईने केला आहे, स्पर्धक श्रीशा हिने आपल्या  स्पर्धेच्या माध्यमातून आई आणि मूल यातील बळकट भावना आणि सांस्कृतिक जोपासना आपल्या समोर ठेवली आहे असे प्रमुख पाहुणे आणि सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केली. 

वरील क्रमांक आपल्या ठरविलेल्या  नियामनुसार सादर केले आहेत, तरीही या स्पर्धेचे उद्दिष्ट प्रबोधन व आपली संस्कृती जोपासासणे ही आहे. स्पर्धेत भाग घेतलेल्या सगळ्याच चिमुकल्यांचे अभिनंदन करुन विजेत्या चिमुकल्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

        या कार्यक्रमाचे आयोजन जान्हवी ताई टक्के (युवा समाजसेविका आरोग्य कर्मचारी दादा ताई फाऊंडेशन संचालिका), राहुल गायकर (समाजसेवक,BE Mech MU asst.professor), मुकुंद गुरव (समाजसेवक युवाउद्योजक), अमोल कानाल (युवा उद्योजक), अभिनेता निलेश किंजलकर (शिवभक्त कोकण कलामंच संस्थापक),  सौ ज्योती सचिन आघाणे (संस्थापिका एक हात मदतीचा सामजिक सेवा संस्था ठाणे) यांनी केले होते. य


Popular posts
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image