श्री.देव नागार्जुन मंदिर देवस्थान ट्रस्ट (मोरे निमई) कापरे यांच्यामार्फत केंद्र शाळा कापरे देऊळवाडा येथे मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न


कापरे/ लोकनिर्माण (तेजस मोरे)

 चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा कापरे देऊळवाडा येथे श्री देव नागार्जुन देवस्थान ट्रस्ट (मोरे निमई) कापरे यांच्यामार्फत विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. 



  कार्यक्रमाचे प्रायोजक बांधकाम व्यावसायिक विनोद नरळकर, श्रीदेव नागार्जुन देवस्थानचे विश्वस्थ लवू नरळकर, सल्लागार बळीराम मोरे,देवस्थानचे अध्यक्ष अनंत मोरे यांच्या प्रमुख प्रेरणेतून वह्या वाटप संकल्प पूर्ण करण्यात आला.कापरे गावाच्या सरपंच सुविधा कदम,सहकारी सोसायटीचे चेअरमन तुकाराम गुरव सर,श्री देव नागार्जुन ट्रस्टचे खजिनदार संदिप कदम,सेक्रेटरी सतिश मोरे, माजी अध्यक्ष सुभाष मोरे, ग्रामपंचायत सदस्य बाळा मोरे, माधुरी मोरे आणि आशिष मोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप पवार आणि सुहास पिलवलकर,माजी सरपंच विजय बांद्रे,मिलिंद नरळकर,जयराज कदम,विजय गुरव, आदर्श शिक्षक जगदीश कांबळे सर,मुख्याध्यापिका मधुबाला दुर्गे, कापरे शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी नाखरेकर, पदवीधर शिक्षिका मानसी महाडीक, उपशिक्षक गणेश सुर्वे.पालक सदस्य शमिका राऊत,अवंतिका खेराडे,अक्षता लाखण,नंदिनी भैरवकर, मयुरी नरळकर, नंदिनी नरळकर आणि ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून निवड झालेले शाळेचे माजी विद्यार्थी शिक्षक नेते बळीराम मोरे सर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या मनोगतातून बालपणीच्या आठवणी जागृत झाल्या.  सामाजिक बांधिलकी समजून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी भौतिक सुविधा पूर्ण करण्याचा मानस मान्यवर व्यक्तिंनी व्यक्त केला आहे.