राजापूर अर्बन बँकेच्या हातिवले ग्राहक सेवा केंद्राचा ५ सप्टेंबर रोजी उद्घाटन सोहळा


राजापूर/ लोकनिर्माण ( सुनील जठार)

 येथील राजापूर अर्बन बँकेच्या हातिवले येथील मायक्रो एटीएम व ग्राहक सेवा केंद्राचा उद्घाटन समारंभ मंगळवार ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बँकेचे अध्यक्ष हनिफ काझी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हातिवले सरपंच अनंत गोटम, माजी पंचायत समिती सदस्य दिवाकर मयेकर, आदिनाथ सांप्रदाय अध्यात्मीक भक्ती ज्ञान प्रसारक मंडळाचे गुरूवर्य भाई गोसावी, राजापूर तालुका चिरेखाण चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संतोष सरफरे, बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्रनाथ ठाकुरदेसाई आदी मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.

यावेळी पंचक्रोशीतील ग्राहक, सभासदांनी उपस्थीत रहावे असे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष प्रसाद मोहकर, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष अनिल करंगुटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी केले आहे.


Popular posts
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image