चिपळूणवासीयांकडून सुभाषराव चव्हाण यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी
आपल्यासाठी आजचा आनंदाचा क्षण असून आपल्या वाढदिनी पुढील पाच वर्षात दोन हजार कोटी ठेवींचा टप्पा गाठण्याचा संकल्प चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी केला. यासाठी आपल्या सर्वांची साथ द्यावी, अशी देखील अपेक्षा यावेळी व्यक्त केली. चिपळूणवासीयांनी सुभाषराव चव्हाण यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा वाढदिवस सहकार भवन सभागृहात उत्साहीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सुरुवातीला सुभाषराव चव्हाण यांच्या कार्य कर्तुत्वाच्या दोन चित्रफिती उपस्थितांना दाखवण्यात आल्या. यानंतर कुटुंबीयांतर्फे औक्षण व ७६ दिव्यांची ओवाळणी करण्यात आली. तसेच सर्वांच्या साक्षीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांनीच टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
यावेळी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालक श्रीकांत खेतले, अशोक कदम, गुलाब सुर्वे, सत्यवान मामुनकर, सोमा गुडेकर, मनोहर मोहिते, राजेश वाजे, रवींद्र भोसले, प्रकाश साळवी, प्रमोद साळवी, प्रकाश पत्की, सौ. स्मिता चव्हाण, श्रीमती नीलिमा जगताप, सौ. नयना पवार, राजेंद्र पटवर्धन, आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम आदी उपस्थित होते.
आपल्या वाढदिवसानिमित्तच्या मनोगतात सुभाषराव चव्हाण म्हणाले की, आपल्यासाठी आजचा आनंदाचा क्षण असून सुरुवातीला आपला वाढदिवस साजरा करण्यास नकार होता. मात्र, वाढदिवसानिमित्ताने जे अनुभवलं ते संस्थेच्या दृष्टीने उपयुक्त व्हायला लागलं. एक वेगळा उत्साह निर्माण होतो. कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट देऊन त्यांच्याकडून काम करण्याची संधी प्राप्त होते. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी सर्व शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसन्येला एकाच दिवशी ६ कोटी १८ लाखांच्या ठेवी तर चौदाशे मासिक ठेवी अंतर्गत ४ कोटी जमवण्यात यश मिळवले, हे काम सोपे नाही. या सर्वांची ऊर्जा, त्यांच्या काम करण्याची पद्धतीमधून आम्ही यशस्वीपणे काम करू शकतो, हे या संस्थेचे यशाचे गमक आहे. सहकारात मोठी ताकद आहे. चांगल्या पद्धतीने काम केलं तर मोठं काम होऊ शकतं, असा आपला विश्वास आहे. एकाने दुसऱ्याला सहकार्य करून पुढे जाण्याचा प्रमाणिकपणे प्रयत्न केला. तर तो चांगला पद्धतीने पुढे जाऊ शकतो. सहकाराचे हे मूलमंत्र आहे. एकत्र घेऊन सगळ्यांच्या ताकदीने पुढे जायचं आणि त्या पद्धतीने काम करायचं आणि सहकारात त्या पद्धतीने चांगलं काम होऊ शकतं. फक्त तिथे प्रामाणिकपणा असला पाहिजे. जातीपंत व राजकारणापासून दूर राहिले पाहिजे प्रामाणिकपणा निष्ठा आणि कष्ट घेण्याची तयारी या पद्धतीने काम केलं तर फार मोठं काम सहकारात उभे राहू शकतं, असा विश्वास सुभाषराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
सुभाषराव चव्हाण यांनी पुढे आपल्या मनोगतात समन्वयक संकल्पना, धनलक्ष्मी व इतर संस्थेच्या त्या योजनांचा आढावा घेतला व पुढील पाच वर्षात संस्थेच्या २ हजार कोटी ठेवी पूर्ण करण्याबरोबरच १०० कोटी ठेवींचा नफा मिळवण्याचा निर्धार यावेळी शेवटी व्यक्त केला.
सेवानिवृत्तीनंतर जनतेच्या स्वप्नपूर्तीसाठी झटताहेत-शेखर निकम
आमदार शेखर निकम यांनी आपल्या मनोगतात नोकरीतून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर सुभाषराव चव्हाण यांनी जनतेच्या स्वप्नपूर्तींसाठी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे रोपटे लावले. या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सुभाषराव चव्हाण यांनी या संस्थेसाठी झोकून देऊन काम केले आहे. यामुळे या संस्थेचे वैभव राहू शकले आहे. तसेच या संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. याचबरोबर वाशिष्ठी डेअरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभी राहिली असून यातून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या समृद्ध करण्याचा ध्यास घेतला आहे, या शब्दात सुभाषराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचे आमदार शेखर निकम यांनी कौतुक केले.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी सुभाषराव चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राजकारणात कोणत्याही पदावर न राहता कोकणात सहकार रुजवू शकले ते नेतृत्व म्हणजे सुभाषराव चव्हाण होय, या शब्दांत त्यांचे कौतुक करतांना तुम्ही स्वतःला जिंकला आहात, म्हणूनच तुम्ही सहकारात यशस्वी होऊ शकला आहात, असे यावेळी नमूद करतांना त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
*सुभाषराव चव्हाण यांचे कौतुक-रमेश कदम*
माजी आमदार रमेश कदम यांनी आपल्या मनोगतात एखादी संस्था सुरू करणे अथवा व्यवसाय सुरू करणे सोपे असते. मात्र, ते दीर्घकाळ टिकवणे कठीण असते. परंतु, सुभाषराव चव्हाण यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था सुरू करून कोकणातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रपर्यंत ही संस्था पोहोचवण्यात यश मिळवले इतकेच नव्हे तर या संस्थेच्या ५० शाखांमधून यशस्वीपणे काम कारभार सुरू आहे. या पद्धतीने काम करणे सोपे नाही, अशा शब्दात सुभाषराव चव्हाण यांचे कौतुक करताना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
*....तर सहकारात काम करण्याची ऊर्जा, प्रेरणा मिळेल-* *प्रशांत यादव*
वाशिष्ठी डेअरीचे मालक व उद्योजक प्रशांत यादव यांवेळी म्हणाले की, कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध होणं सोपे. मात्र, सिद्ध होणं कठीण. कोकणात आता उत्तम पद्धतीने सहकार सुरू आहे, याचे सारे श्रेय सुभाषराव चव्हाण यांना जाते. जेव्हा चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था सुरू केली. तेव्हा या संस्थेला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, संस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये कर्जदाराबरोबरच ठेवीदाराला देखील महत्व दिलं जातं. यातून संस्था मोठी झाली आहे. सुभाषराव चव्हाण यांनी 'माणसांना संभाळलं', माणसांनी संस्था सांभाळली, म्हणूनच ब्रीदवाक्य 'आपली माणसे, आपली संस्था,' असे पुढे आले.
तर आता सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वाशिष्ठी मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट प्रकल्प उभा राहिला आहे. सुरुवातीला ८०० लिटर दुधापासून सुरू केलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे २ हजार १०० लिटर दूध संकलन होत आहे. तीन हजार शेतकरी या प्रकल्पाला जोडले गेले आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव मिळाला पाहिजे, ही भावना सुभाषराव चव्हाण यांची असल्याने शेतकऱ्यांना शासनाच्या पेक्षा जादा दर दुधाला दिला जात असल्याचे यावेळी सांगितले. आपण सगळ्यांनी जो विश्वास सुभाषराव चव्हाण यांच्यावर दाखवला आहे, तो विश्वास आमच्या पाठीशी उभा राहील, यातून सहकारात काम करण्याची ऊर्जा प्रेरणा मिळेल, असा विश्वास प्रशांत यादव यांनी यावेळी व्यक्त केला.
मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
यावेळी कृष्णा खांबे, एल. के. शिंदे, पत्रकार सतीश कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य सहदेव बेटकर, माजी सभापती शौकत मुकादम, माजी जिल्हा परिषद सदस्य सहदेव बेटकर, संतोष थेराडे आदींनी आपल्या मनोगतात चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.
यावेळी अप्पर आयुक्त तथा सहसचिव (सहकार) एस. बी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, खेर्डीचे उपसरपंच विनोद भुरण, बाळा दाते, सदस्य अभिजीत खताते, अजित खताते, अविनाश हरदारे, सुभाष जाधव, जयंत शिंदे माजी पंचायत समिती सदस्य कृष्णा हरेकर, युवा नेते सिद्धेश ब्रीद, विजय कुवळेकर, संजीव साळवी आदी उपस्थित होते. तर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र राजमाने, प्रांताधिकारी आकाश निगडे तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन निहार गुढेकर, समीर जानवलकर, निलेश भुरण, मिलिंद कापडी, लायन्स क्लबचे अजय भालेकर, रोटरी क्लबचे रमण डांगे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, नामवंत ठेकेदार सुरेश शेठ चिपळूणकर अरविंद आंब्रे, बळीराम मोरे राष्ट्रवादीचे, भाजपा उत्तर रत्नागिरी उपाध्यक्ष रामदास राणे, सहाय्यक निबंधकचे श्री. घोलप, सौ. माने, लेखापरीक्षक श्री. गीते, डॉ. अमरसिंह पाटणकर, श्री सुधीर चव्हाण , डॉ. अभिजित सावंत, आदींनी उपस्थित राहून सुभाषराव चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्ना यादव यांनी केले.