नवीन पनवेलमध्ये लोकनिर्माण आणि लोकटाइम्स वृत्तपत्राच्या कार्यालयाचे उद्घाटन

 

नवीन पनवेल (रत्नाकर पाटील)

लोकनिर्माण आणि  लोकटाइम्स या वृत्तपत्राचे नवीन पनवेल येथील कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच (दि.२ सप्टेंबर) पनवेल मीडिया प्रेस क्लबचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार गणेश कोळी यांच्या शुभहस्ते आणि पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार रत्नाकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. नवीन पनवेल  सेक्टर १४ येथील ई१,०८ मध्ये  सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी  लोकनिर्माणचे मुख्य संपादक बाळकृष्ण कासार,  लोकटाइम्स आणि लोकनिर्माणचे निवासी संपादक सुनील भुजबळ,  उपसंपादक संपत सुवर्णा, सप्तपदी नाट्य अभिनेते संतोष गायकर, लोकांकितचे संपादक संजय पवार, मराठा सेवा संघ अध्यक्ष प्रकाश चांदिवडे, पत्रकार प्रवीण मोहोकर, भगवान कोलगे, संजय हिरेमठ, सामाजिक कार्यकर्ते वसंत सोनावणे, एम.आर. कदम, विष्णू गवस, नरेश पाटील, ॲड. किशोर टोंपे, समीर भगत, रमेश फडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



     यावेळी बोलताना पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी म्हणाले की, कार्यालयाच्या माध्यमातून सर्व स्तरातील बातम्या देत असतांना सर्व स्थरातील लोकांना न्याय मिळाला पाहीजे,  त्याच अनुषंगाने बातम्या प्रकाशित करण्यासाठी येथील पत्रकारांनी आपले निपक्षपाती योगदान द्यावे जेणेकरून सामाजिक, राजकीय, धार्मिक चालू घडामोडी विषयी सर्व जनतेला वर्तमानपत्राच्या माध्यमातून माहिती वाचायला मिळेल याची दक्षता घ्यावी. असेही गणेश कोळी म्हणाले.



    यावेळी बोलताना रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील म्हणाले की, लोकनिर्माण आणि लोकटाइम्स या वृत्तपत्राच्या माध्यमातून दिनदुबळ्या जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य आपल्या लेखणीतून घडो, तसेच पत्रकारितेच्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचे कार्य निर्भिडपणे आपल्या हातून घडो, असा आशावाद रत्नाकर पाटील यांनी व्यक्त केला.

Popular posts
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image