समाजहितासाठी निर्भीडपणे विचार मांडणारे वृत्तपत्र लाेकनिर्माण - आमदार शेअर निकम


आमदार शेखरजी निकम यांच्या उपस्थितीत लोकनिर्माण वृत्तपत्राच्या आरती संग्रहाचे प्रकाशन


 चिपळूण प्रतिनिधी 

मुंबई, कोकण, पश्चिम- उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्व ठिकाणी एकाच वेळेस प्रसिद्ध होणारे मराठी वृत्तपत्र म्हणजे लोकनिर्माण. लोकनिर्माण वृत्तपत्र दरवर्षी गणपती उत्सवाला आरती संग्रहाचे प्रकाशन करते. यावेळी चिपळूण - संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखरजी निकम यांच्या प्रमुख हस्ते लोकनिर्माण आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या कार्यक्रम प्रसंगी आमदार निकम यांनी शुभेच्छा देताना म्हणाले की, लोकनिर्माणचे काम अतिशय चांगले असून समाजामध्ये पारदर्शक काम पाहावयास मिळत आहे, तसेच कासार सर यांचे देखील काम कौतुकास्पद आहे. 



    सर्वात आधी  बातमी प्रसिद्ध करणारे आणि  लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्भिडपणे विचार मांडणारे वृत्तपत्र आहे असे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अबू ठसाळे यांनी देखील शुभेच्छा देताना सांगितले. तर चिपळूणातून वृत्तपत्राची सुरुवात करुन आज पंधरा वर्षात अनेक जिल्ह्यांत वृत्तपत्राचे वितरण होत असून पर्यावरणावर सातत्याने जनजागृती करुन आज आरती संग्रहात देखील पर्यावरणावर जनसामान्यांना प्रबोधन करणारे लिखाण  वाचण्यास मिळतात असे उपनगराध्यक्ष प्रकाश (बापू ) काणे यांनी बोलताना सांगितले. जनतेच्या हितासाठी लोकनिर्माण कटीबद्ध असल्याचे अध्यक्षीय भाषणात संपादक बाळकृष्ण कासार यांनी सांगितले.





कार्यक्रमाची  सुरुवात कुंडीतील रोपट्याला पाणी घालून करण्यात आली तर मान्यवरांचे पेन देऊन स्वागत करण्यात आले.



      यावेळी सदर कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, संपादक बाळकृष्ण कासार, चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अबू ठसाळे, सामाजिक कार्यकर्ते व सहसंपादक युयुत्सु आर्ते,  माजी उपनगराध्यक्ष प्रकाश (बापू काणे), चिपळूण तालुका प्रतिनिधी जमालुद्दीन बंदरकर, शहर प्रतिनिधी स्वाती हडकर, संगमेश्वर तालुका प्रतिनिधी सत्यवान विचारे,   सौ. सुविधा कासार, धनंजय भांगे, विनायक सावंत, यशवंत गोरीवले, सचिन साडविलकर, दादू गूढेकर, अभिजित खरावते, महेंद्र कुऱ्हाडे, संतोष कोकरे, रंजना कदम, तेजस मोरे, मानसी सावंत, मेरुन्निसा साखरकर, विशाल रापटे, प्रसाद सदलगे, सुरेश काजारी, अहमद चौगुले आदी उपस्थित होते.


Popular posts
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image