राजापूर नगर परिषदेच्या कर्मचार्यांचे ३ ऑक्टोंबरपासुन काम बंद आंदोलन

 

राजापूर / प्रतिनिधी 

    राजापूर शहरातील काही राजकिय पुढारी , त्या पुढार्यांचे समर्थक व काही उन्माद नागरिक यांच्यामुळे काम करणे कठीण झाल्याची बाब निदर्शनास आणुन देत राजापूर नगर परिषद कर्मचारी संघटनेने ३ ऑक्टोंबर २०२३ पासुन कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे . याबबतचे निवेदन  नगर परिषद कर्मचारी संघाने मुख्याधिकारी याना दिले आहे . 


    शहरातील काही राजकारणी लोकांचे समर्थक तसेच काही उन्माद नागरीक कर्मचारी कामावर असताना त्यांना दमदाटी करणे, त्यांचे अंगावर मारणेसाठी धाऊन जाणे अशा तक्रारी नगर परिषद कर्मचारी संघाकडे  आल्या असल्याची बाब स्पष्ट करत संघाने राजापूर नगर परिषद कर्मचारी यांना काम करणे खुप कठिण होऊन बसलेले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे . 

      दिनांक २८/०९/२०२३ रोजी सायंकाळी ७.२४ मीनिटांनी आमचे सफाई मुकादम जवाहर चौक येथे कामावर असताना श्री गणेश मुर्ती विसर्जनचे मिरवणूकीमध्ये एक बैल घुसत असताना सदर बैलाला श्री. राजन जाधव हे बाजूला करीत असताना एका अज्ञाताने तेथे उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी यांची लाठी खेचून आमच्या कर्मचा-याच्या अंगावर मारावयास धाऊन गेले. आमचा कर्मचारी कर्तव्याचे पालन करीत असताना तसेच कोणतीही चुक नसताना आमच्या कर्मचा-यावर धाऊन जाणे हे उचित नाही. अशामुळे आमच्या कर्मचा-यांचे मनोधर्ये खच्चीकरण होत असून आमच्या कर्मचा-यांच्या जीवीतास धोका उदभवतो असेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे . 

        या प्रकरणी संबंधित अज्ञातावर कारवाइ करण्याची मागणी नगर परिषद कर्मचारी संघाने केली असुन अन्यथा आम्ही दिनांक ३ ऑक्टेबर २०२३ पासून कामबंद आंदोलन करणार असल्याचे नमुद केले आहे .  या कामबंद आंदोलनांध्ये  नगर परिषदेचे सर्व आवश्यक सेवा बंद ठेवणेत येतील असे स्पष्ट केले आहे . 




Popular posts
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image