पनवेल/लोकनिर्माण (सुनील भुजबळ)
आज झालेल्या पनवेल तालुक्याच्या दहीहंडी उत्सवात रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे एकूण ३२ गोविंदा पथकांनी यामध्ये सहभाग घेतला आणि एकूण रक्कम व ५,०९,९९९ होती ७ थर, ६ थर आणि ५ थर या सर्व थरांसाठी रक्कम आणि परितोषके ठेवण्यात आली होती.
खरोखरच यापूर्वी कधीही झालेला नव्हता असा रेकाॅर्ड पनवेल तालुक्यामध्ये पहिल्यांदाच पाहण्यात आला. मनसे पनवेल तालुका दहीहंडीसाठी आलेल्या सर्व गोविंदा पथकांचे पनवेल तालुक्याच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
यावेळी मानाची दहीहंडी कळंबोली येथील शिवस्वराज्य गोविंद या पथकांनी फोडली. वरील कार्यक्रम मनसे चे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील, पनवेल तालुका सचिव अमोल पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.