बंगलोर येथे संपन्न झालेल्या १४ व्या राष्ट्रीय स्मरणशक्ती स्पर्धेमधे प्रकाश कारखानीस यांना एक सिल्व्हर मेडल व तीन ब्रांझ मेडल्स ने सन्मानित


 रत्नागिरी/लोकनिर्माण (सुनील जठार )

 बंगलोर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या १४ व्या राष्ट्रीय स्मरणशक्ती स्पर्धा - National Memory competetion या स्पर्धेमधे रत्नागिरी जिल्ह्यातील चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचे श्री प्रकाश कारखानीस यांना त्यांच्या वयाच्या ६४ व्या वर्षी या स्पर्धेत एक सिल्व्हर मेडल व तीन ब्रांझ मेडल्स, अशी एकूण चार मेडल्स मिळाली आहेत. प्रकाश कारखानीस यांनी शासकीय सेवेनंतर सामाजिक चळवळीत भाग घेतला. अनेक संस्था आणि अनाथाश्रम मधून कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले आहे.



      समस्त सी के पी मंडळीना अभिमान वाटावा अशी कौतुकास्पद कामगिरी त्यांच्याकडून घडली आहे. समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रत्नागिरी जिल्हा सी के पी समाजाच्या वतीने सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी त्यांना अभिष्टचिंतन चिंतले आहे. अत्यंत कठीण अशा स्पर्धमधे प्रकाशरावांना मिळालेले यश सुवर्णाक्षरांनी कोरुन ठेवण्यासारखेच आहे असे रत्नागिरी जिल्हा सीकेपी समाजाचे संस्थापकिय अध्यक्ष सुनिल शरद चिटणीस यांनी अभिनंदन करताना म्हटले आहे.