कळंबोली लोकनिर्माण प्रतिनिधी
चिपळूण तालुक्यातील नवजवान मित्र मंडळ किजबिले वाडी व वाघेश्वरी मंदिर ट्रस्ट बामणोली सल्लागार, मराठा सेवा संघ रायगड जिल्हाध्यक्ष, बळीराज सेना रायगड जिल्हाध्यक्ष आणि जयभवानी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश चांदीवडे यांच्या मातोश्री पार्वती रामचंद्र चांदीवडे यांचे बुधवार ११ रोजी सायंकाळी वयाच्या ७८ व्या वर्षी वृद्धपकाळाने पनवेल कळंबोली येथे निधन झाले.
अतिशय कठीण परिस्थितीत यांनी आपल्या कुटुंबाला आकार देत घडवले होते. शांत, मनमिळावू स्वभाव असल्याने त्यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. कोणत्याही कार्यक्रमात त्या मनमोकळेपणाने सहभागी होत. विशेषतः आपल्या मुलाचे सर्व कार्यक्रमाला त्या आवर्जून उपस्थित राहात. सर्वांचे एकत्रित कुटुंब आहे. हे त्यांच्या घराण्याचे खास वैशिष्ट्य आहे. पनवेल कळंबोली येथे बरेच जीवनातील दिवस गेले. त्यांच्या जाण्याने चांदिवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.