पनवेल लोकनिर्माण प्रतिनिधी
मराठा समाज ओबीसी प्रवर्गातुन कायदेशीर आणि घटनात्मक आरक्षण मागत असुन मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलन मुळे मराठा पुन्हा एकदा पेटुन उठला आहे ! जरांगे यांनी उपोषण सोडावे यासाठी एक महिना ची मुदत घेऊन सरकार आरक्षण बाबत संवेदनशील आहे असं वाटतं असतानाच मराठा समाजाला मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवण्याचे सरकार चे कारनामे काही थांबलेले नाहीत !
सगळेच जाणतो की सध्या मनोज जरांगे यांचे ओबीसी प्रवर्गातुन कायदेशीर आणि घटनात्मक मराठा आरक्षण या मागणीबाबत महिनाभरात सरकार कडुन काय तो सकारात्मक निर्णय लागेल अशी आशा आहे !
पण याचवेळी दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने ६०,००० शासकीय पदासाठी नोकरभरती काढली आहे ! खुल्या वर्गातील जास्त मेरीट मुळे शासकीय नोकरीत मराठा टक्केवारी कमी होत चालली आहे आणि शासकीय नोकरीत मराठा नगण्य होत चालला आहे ! एकीकडे जरांगे यांना उपोषण आंदोलन पासुन परावृत्त करायचे, वेळ मारुन न्यायची आणि दुसरीकडे शासकीय नोकरभरती करून मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसायचा असा विचित्र प्रकार सरकार करत आहे !
समजा सुदैवाने एक महिना नंतर समाजाच्या दबावामुळे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जर सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले तरी ही नोकरभरती त्या आधीच संपलेली असणार ! या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन " शासनाने किमान एक महिना ही शासकीय नोकरभरती थांबवावी" अशी मागणी सकल मराठा समाजामार्फत आम्ही करत आहोत, सरकारने या मागणीची गंभीर दखल घ्यावी अन्यथा मराठा समाज नोकरभरती होऊ देणार नाही आणि होणा-या परिणामांची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल.. !
!! मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र !!
!! सकल मराठा समाज, महाराष्ट्र !!