मोठ्या पडद्यावर घाणेखुंट मध्ये रंगणार विश्वचषक फायनलचा थरार, शिवसेना,युवासेना व जय भवानी मित्र मंडळ करणार मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण.

 

लोटे /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)

 खेड तालुक्यातील घाणेखुंट येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या विश्वचषकातील अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर डीजेच्या आवाजासहित करण्यात येणार आहे. घाणेखुंट मधील शिवसेना, युवासेना उ.बा.ठा. गट व जय भवानी मित्र मंडळ घाणेखुंट यांच्यावतीने आज सायंकाळी सहा वाजल्यापासून ते सामना संपेपर्यंत शिवसेना शाखा घाणेखुंट येथे करण्यात येणार आहे.

         क्रिकेट विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमध्ये सलग दहा सामने जिंकून भारतिय क्रिकेट संघ थेट अंतिम सामन्यात पोहोचलेला आहे. यामुळे समस्त भारतवासीयांच्या व क्रिकेट शौकिनांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आजचा अंतिम सामना बलाढ्य ऑस्ट्रेलिया बरोबर होणार असून,येथे भारतीय फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील पराक्रम ऑस्ट्रेलियाला धूळ चारण्यास कमी पडणार नाही,अशी समस्त भारतवासीया व क्रिकेटशोकनांची खात्री आहे. चार वर्षांनी एकदा येणारा विश्वचषक आणि त्यातही भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचलेला असताना,हा अंतिम सामना पाहण्याची सुवर्णसंधी कोणीच वाया जाऊ देणार नाही. एवढेच काय तर अनेक लोक कामधंदे सोडून या सामन्यासाठी वेळ राखून ठेवतात.आणि ही पर्वणी घाणेखुंट मधील शिवसेना,युवासेना, ऊ.बा. ठा.गट व जय भवानी मित्र मंडळ घाणेखुंट यांनी पंचक्रोशीतील सर्व क्रिकेटशौकिनांना द्यायचे ठरवले आणि मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्याचे आयोजन केले आहे, असे जय भवानी मित्र मंडळ घाणेखुंट चे अध्यक्ष श्री अनिकेत काते यांनी सांगितले.

Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोकनिर्माण मराठी ई - वृत्तपत्र
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image