देवरूखात लोकनिर्माण दीपावली विशेषांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न


चिपळूण /लोकनिर्माण (स्वाती हडकर)

      लोकनिर्माण वृत्तपत्राचा पहिला अंक २००९ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर  जागतिक घडामोडीवर दृष्टीक्षेप टाकून सातत्याने दीपावली विशेषांक प्रकाशित करण्यात आले. त्यातील काही अंकांना राज्य तर कोविड १९ या विशेषांकाला जागतिक मराठी दिवाळी अंक या  आंतरराष्ट्रीय संघटने कडून उत्कृष्ठ दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळाला होता. आता पंधराव्या वर्षातील पंधरावा दिवाळी अंक देवरूख येथील पार्वती पॅलेस हाॅटेल मधील सभागृहात खेड, देवरूख नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन विस्पुते यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 

        यावेळी जिल्ह्यातून आलेल्या विविध वृत्तपत्राचे पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार हा कोणाच्याही दबावाला शांत न बसता निर्भिडपणे अन्यायाविरुद्ध लेखणी फिरविणारा असावा असे मत बळीराम सेना तालुका अध्यक्ष नितीन लोकम यांनी व्यक्त केले. तर लोकनिर्माणने गेल्या १४ वर्षात आपल्या वृत्तपत्रातून सर्व सामान्यांना न्याय मिळवून दिलेला असून भविष्यात अशाच प्रकारचे विधायक काम करावे असे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खेड, देवरूख नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन विस्पुते यांनी बोलताना व्यक्त केले. तर कोणाच्याही दबावाला बळी न पडता आम्ही आमच्या वृत्तपत्राचे माध्यमातून प्रबोधन करुन सर्व सामान्यांना नक्कीच दिलासा देऊ असे अध्यक्षीय भाषणातून संपादक बाळकृष्ण कासार यांनी सांगितले. यावेळी संगमेश्वर तालुका प्रतिनिधी सत्यवान विचारे यांनी पत्रकारीता कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते आणि लोकनिर्माणचे सहसंपादक युयूत्सु आर्ते यांनी केले. 







         या प्रकाशन सोहळ्याला खेड, देवरूख नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन विस्पुते, बळीराजा सेना तालुका अध्यक्ष नितीन लोकम, उब प्रकल्पाच्या रुबीना चव्हाण मॅडम, संपादक बाळकृष्ण कासार, सह संपादक युयूत्सु आर्ते, सहसंपादिका  सौ. सुविधा कासार, उपसंपादक प्रमोद आंब्रे, संगमेश्वर तालुका प्रतिनिधी सत्यवान विचारे, रत्नागिरी तालुका प्रतिनिधी समीर शिरवाडकर, चिपळूण  प्रतिनिधी स्वाती हडकर, देवरुख प्रतिनिधी रंजना कदम, दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रमोद हर्डीकर इ. मान्यवर उपस्थित होते.