चिपळूण/लोकनीर्माण (संतोष शिंदे)
चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागांमधील आकले, कादवड, दादर, नांदिवसे गावातील नद्यांमधून जेसीबी ने खोदकाम करून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. त्याचबरोबर नदीमधील दगड-गोटे याची सूद्धा वाहतूक केली जात आहे. त्यामुळे नदीमध्ये मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी वाळूचा निचरा झाल्याने जमिनीतील पाणी साठा कमी होऊन पाण्याचा दुष्काळ पडण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर पूर्ण नदी पात्रात पडलेल्या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात नदीचा प्रवाह बदलून पूर-परिस्थिती निर्माण होऊन नुकसान होऊ शकते.
याविषयी माहिती घेतली असता कादवड गावातील एक स्थानिक रहिवासी हे आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर मधून वाहतूक करतात अशी तेथील स्थानिकांडून कुजबुज सुरु आहे. तरी संबंधित प्रशासकीय अधिकारी हे याकडे लक्ष देऊन कारवाई करतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.