गुहागर लोकनिर्माण प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन नळ पाणी योजनेतून शिवसेना स्थानिक कार्यसम्राट आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या अथक परिश्रमाने चिपळूण - वाघिवरे गावासाठी लाभलेल्या घरपट नळपाणी योजनेच्या भुमि पुजनाचा शुभारंभ रविवार दि.३/१२/२०२३ रोजी बोरगाव पाचदेवळी येथे संपन्न झाला.
आमदार भास्कर शेठ जाधव, युवा नेतृत्व विक्रांत शेठ जाधव यांच्या परिवाराच्या वतीने सदर योजनेसाठी विनामुल्य जागा उपलब्ध करून दिली.
यावेळी त्यांचे कुटुंब प्रमुख बाळा (काका) शिर्के, पंचायत समिती सदस्य नंदकुमार शिर्के, प्रभाकर जाधव, प्रितम वंजारे, संतोष तांदळे, वाघिवरे गांवचे माजी सरपंच व स्थानिक अध्यक्ष शांताराम भेकरे, गांवचे सरपंच व खजिनदार/सचिव गोपाळ कदम, पोलिस पाटील अनिल जाधव, मुंबई शाखेचे अध्यक्ष लक्ष्मण गोणबरे आणि सर्व पदाधिकारी व सभासद, पुणे शाखेचे अध्यक्ष संतोष कदम आणि सर्व पदाधिकारी व सभासद, स्थानिक सर्व पदाधिकारी, सभासद व महिला मंडळ उपस्थित होते.
यांच्या उपस्थितीत बोरगांव पाचदेवळी येथे संपन्न झाला.