"महाज्योती" साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा परिक्षेला विरोध, सरसकट अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थी आक्रमक


पाटण /प्रतिनिधी विनोद शिरसाट

महाज्योती अधिछात्रवृत्तीसाठी 2023 वर्षासाठी राज्यातून एकूण 1382 विद्यार्थी पात्र ठरले आहेत, मात्र त्यातून 200 जणांची निवड करण्यासाठी रविवार दिनांक 17 रोजी परिक्षा घेण्यात येणार आहे. ती रद्द करून विद्यार्थ्यांना सरसकट आणि नोंदणी दिनांकापासुन अधिछात्रवृत्ती देण्यात यावी अशी मागणी महाज्योती  संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. 



महाज्योती तर्फे ओबीसी, भटके विमुक्त, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती दिली जाते. 

2021 मध्ये 957 तर 2022 मध्ये 1226 विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्ती देण्यात आली होती. 2023 मध्ये शासनाने फक्त 200 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती दिली जाईल अशी जाहिरात काढली आहे. या निर्णया विरोधात मुंबई आझाद मैदानात 40 दिवस उपोषण केले ,मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक लावली नाही. रविवारी परिक्षा घेण्याचे जाहीर केले आहे, मात्र यातील आभ्यासक्रमही वेगळा आहे, परिक्षेच्या एक आठवडा अगोदर आभ्यासक्रम बदलून परिक्षा घेणे चुकीचे आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे हि परिक्षा तात्काळ रद्द करण्यात यावी. 

युजीसीच्या निर्णयानुसार अधिछात्रवृत्तीची रक्कम 31 हजार वरून 37 हजार रुपये (जेआरएफ), तर 35 हजारांवरून 42 हजार रुपये (एसआरएफ) देण्याबाबतचे परिपत्रक 20 सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी. 

तसेच घरभाडे भत्ता केंद्र सरकारच्या 2019  मधील नियमानुसार वाढवून देण्यात यावे अशा मागण्या .महाज्योती संशोधक कृती समितीच्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. 

मंत्री अतुल सावेंचे दुर्लक्ष!

आपल्या मागण्यांकडे ओबीसी मंत्री अतुल सावे दुर्लक्ष करीत आहेत. आम्ही पेटवून घ्यावे का जलसमाधी घ्यावी ..? का मंत्री केसरकर यांच्या सल्ल्यानुसार पुन्हा अकरावीला प्रवेश घ्यावा असा संतप्त सवाल या विद्यार्थ्यांनी केला आहे.

Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image