सलग सहाव्यांदा राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी" बँको" पुरस्काराने सन्मानित


रत्नागिरी लोकनिर्माण टीम 

सहकार क्षेत्राला बळकटी मिळावी या उद्देशाने अविज पब्लिकेशन व गॅलक्सी इन्मा यांच्या वतीने दरवर्षी "बँको ब्ल्यू रिबन" हा मानाचा पुरस्कार दिला जातो. पतसंस्था क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी ला राज्यस्तरीय मानाचा असा "बँको ब्ल्यू रिबन २०२३" हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सदरचा पुरस्कार वितरण सोहळा दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी दमण येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

संस्थेने सभासद, शेअर्स, निधी, ठेवी, कर्ज, गुंतवणुका, खेळते भागभांडवल यामध्ये केलेली वाढ, वसुलीचे उत्तम प्रमाण, सीडी रेशो चे आदर्श प्रमाण, नेट एनपीए शून्य टक्के, सातत्याने संस्थेने मिळविलेला "अ" वर्ग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सभासदांना देण्यात आलेल्या आरटीजीएस/ एनईएफटी, एसएमएस सारख्या सेवासुविधा, मिनी ATM,  संस्थेच्या शाखा व त्यांचे व्यवस्थापन, संस्थेने जपलेली सामाजिक बांधिलकी या निकषाच्या आधारे संस्थेने हा मानाचा "बँको ब्ल्यू रिबन" पुरस्कार मिळाला आहे.   

संस्थेचे अभ्यासू, संयमी पण प्रसंगी आक्रमक, कल्पक, करारी, धाडसी व योग्य निर्णय क्षमता असे बहुआयामी चतुरस्त्र नेतृत्व लाभलेले यशस्वी चेअरमन प्रकाश मांडवकर तितकीच संयमी व तोलामोलाची साथ देणारे संचालक मंडळ यांनी सातत्याने सभासदांच्या हिताचे घेतलेले निर्णय व त्याची कर्मचारी वर्गाकडून केली जाणारी प्रभावी अंमलबजावणी यामुळेच संस्था नेहमी प्रगती पथावर काम करत आहे. संस्थेने ग्रामीण भागात काम करताना आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून व्यवसाय वृद्धीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे सलग सहा वर्ष मानाच्या अशा '' बँको ब्ल्यू रिबन '' पुरस्कारावर संस्था आपली मोहोर उमटवू शकली आहे. 

या यशाचे श्रेय संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक तसेच भविष्याचा वेध घेवून चेअरमन सन्मा. श्री. प्रकाश मांडवकर यांचे नेतृत्वाखाली कार्यमग्न असणारे संचालक मंडळ, स्थानिक कमिटी सदस्य, कर्ज वसुली अधिकारी श्री. श्रीकांत राघव, सर्व शाखांचे शाखाधिकारी, सर्व कर्मचारी, पिग्मी व आरडी एजंट, सीए एन.एन. पाटणकर, कायदेविषयक सल्लागार एस.एम.देसाई या सर्वांचे असल्याचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर  यांनी सांगितले. 

सलग सहाव्या वर्षी सहकार क्षेत्रातील मानाचा "बँको ब्ल्यू रिबन २०२३" हा पुरस्कार पटकावल्याबद्दल राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image