चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न

 

पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून चिपळूण नगरपरिषद हद्दीत ४२ कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन


मी विकासाला चालना देणारा मंत्री: उदय सामंत


चिपळूणच्या पवन तलावासाठी दोन कोटी तर मैदानाला एक कोटी देणार:- पालकमंत्री


सहा महिन्यापूर्वी ज्या कामाचे भूमिपूजन केले  आणि त्यांचे उदघाटन केल्याचे मला आनंद:- उदय सामंत


निधी प्राप्त करून चिपळूण वासियांचा पाणी प्रश्न मार्गी लावणार:- उदय सामंत

चिपळूण /लोकनिर्माण (स्वाती हडकर )



चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ  पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला. यावेळी चिपळूण नगरपरिषद हद्दीतील विकासासाठी ४२ कोटी रुपायांचा निधी पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी उपलब्ध करून दिल्या बद्दल पालकमंत्री उदय सामंत यांचे चिपळूण वासियांनी आभार मानले. या विकास कामांमध्ये  छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणे व शिवसृष्टी उभारणे कामाचे भूमिपूजन, सुक्या कचऱ्यावर गेसीफायद्वारे प्रक्रिया करणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह इमारत विकसित करणे, दरडग्रस्त भागातील खेड कांगणेवाडी येथील श्री कांगणे यांच्या घरामागील डोंगराळ भागांमध्ये आरसीसी संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, नगरपरिषदच्या मोकळ्या जागेमध्ये बगीच्या विकसित करणे, पेट माफ भागातील अंतर्गत रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, कै.अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल येथे बॅडमिंटन कोर्ट चेंजिंग रूम सह बांधकाम व विद्युतीकरण करणे, अशा विविध कामाची भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.



     या कार्यक्रमाचे औचित्य साधून पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूणवासियांशी संवाद साधला ते म्हणाले मी विकासाला चालना देणारा मंत्री असून राजकारणा वेळी राजकारण करू पण आता जनतेची सेवा करण्याचे मला भाग्य मिळाले असल्याचे सांगत जिल्ह्यावासियांची सेवा करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.ते पुढे म्हणाले चिपळूणच्या पवन तलावासाठी दोन कोटी तर मैदानाला एक कोटी देणार असून चिपळूण शहर हे सांस्कृतिक आणि कला - क्रीडा यांचा वारसा लाभलेले शहर असून चिपळूणच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देणार आहे.



सहा महिन्यापूर्वी मीच या क्रीडा संकुलाचे भूमिपूजन केले त्यांच क्रीडा संकुलाचे आज उदघाटन केल्याचे पालकमंत्री म्हणून मला आनंद आहे.चिपळूणवासियांचा प्राणी प्रश्न खूप वर्ष प्रलंबित आहे.  निधी प्राप्त करून चिपळूण वासियांचा पाणी प्रश्न सरकारच्या माध्यमातून मार्गी लावणार असल्याचा शब्द उदय सामंत यांनी दिला.

  या कार्यक्रमासाठी संगमेश्वर चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, सचिन कदम, रियाना बिजले, उमेश सकपाळ,मोहम्मद फकीर, संदेश अहिरे, मिलिंद कापडी, रेशमी गोखले, प्रशासक प्रसाद शिंगटे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.