स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची “अंमली पदार्थ विरोधी कारवाई”. रत्नागिरी शहर परिसरात “गांजा” सदृश अमली पदार्थासह “एक जण ताब्यात”


रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी 

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्त घालण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, मा. श्री धनंजय कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिलेल्या होत्या. 

या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. नितीन ढेरे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके तयार करून त्यांच्या मार्फत महत्त्वाच्या ठिकाणी गस्त घालण्याबाबत अधिक सूचना दिल्या होत्या. 

दिनांक 03/04/2025 रोजी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक हे रत्नागिरी शहर परिसरात गस्त घालत असताना मिरजोळे-नाचणकर चाळ, रत्नागिरी परिसरामध्ये एका रिक्षा चालकाच्या संशयित हालचाली वरून त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचा इसम हा पोलीस रेकॉर्ड वरील आरोपी लक्ष्मण रवी नायर वय 34 वर्ष रा. नाचणकर चाळ मिरजोळे ता.जि. रत्नागिरी असल्याचे निष्पन्न झाले. या पथकाने त्याच्या ताब्यातील पिशवी, पंचां समक्ष तपासून खात्री केली असता त्यामध्ये 477 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ मिळून आला म्हणून त्यास ताब्यात घेण्यात आले तसेच आरोपी लक्ष्मण रवी नायर वय 34 वर्ष रा. नाचणकर चाळ मिरजोळे ता.जि. रत्नागिरी यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 129/2025 एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8(क), 22(अ), 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आरोपी लक्ष्मण रवी नायर वय 34 वर्ष रा. नाचणकर चाळ मिरजोळे ता.जि. रत्नागिरी याच्या कडून 477 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ व एक ऑटो रिक्षा (क्रमांक MH08-AQ-1665) असे मिळून एकूण 1,70,000/- हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 

या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे. 

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील खालील नमूद पोलीस अधिकारी / अंमलदार यांनी केलेली आहे.

1) श्री . प्रमोद वाघ, स.पो.नि, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी,

2) पो.हवा / 251 श्री. शांताराम झोरे,

3) पो.हवा / 477 श्री. नितीन डोमणे,

4) पो.हवा / 306 श्री. गणेश सावंत,

5) पो.हवा / 1238 श्री. प्रवीण खांबे व 

6) पो.हवा / 1401 श्री. सत्यजित दरेकर

Popular posts
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image