ओमकार शाळेच्या मनमानी कारभारामुळे निवासी नागरिक त्रस्त!

 डोंबिवली लोकनिर्माण न्युज टीम 

             डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील ओमकार शाळेच्या व्यवस्थापनाकडून सर्वच बाबतीत होत असलेल्या मनमानीमुळे निवासी भागातील नागरिक त्रस्त झाले असून या शाळेबद्दलच्या तक्रारी समाजमाध्यमातून येथील नागरिक मांडत आहेत.

            काल शुक्रवारी सकाळी केळकर रोडवर एक वृद्ध ७० वर्षाची महिला सुप्रिया अशोक मराठे ही याच शाळेच्या बसचा चाकाखाली येवून मरण पावली. निवासी भागात या शाळेच्या बसेस इतक्या जोरात जात येत असतात की कधीतरी येथेही असे अपघात होऊ शकतात. ओमकार शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळात मुलांना सोडण्यात व नेण्यात येणार्‍या पालकांची वाहने ही शाळेच्या गेटसमोर मुख्य रस्त्यावरच अस्ताव्यस्त उभी केलेली असतात. त्यात शाळेच्या आतून बाहेरून येणार्‍या बसेस यांची त्यांना घाई झालेली दिसते. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील ट्रॅफिक जॅम होते. शाळेच्या व्यवस्थापनाला काही सुजाण नागरिकांनी याबद्दल सांगूनही यावर पाहिजे तशी उपाययोजना शाळेकडून होताना दिसत नाही. याबद्दल मानपाडा पोलिसांकडे काहींनी यापूर्वी तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनीही त्यांना काही चांगल्या सुचना केल्या पण शाळेकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे निवासी परिसरात नेहमीच ट्रॅफिक समस्या होत असते.

              ओमकार शाळेला एमआयडीसी कडून एकापाठोपाठ एकूण पाच मोठे विविध भूखंड मिळाले असल्याचे आणि अजूनही त्यांना शाळेच्या बाजूचे इतर संस्थेचे भूखंड पाहिजे असल्याचे माहिती पडत असून आपल्या ओळखीचा आणि पैशाच्या बळावर हे इतर भूखंड बळकावण्याचे जोरदार प्रयत्न शाळेच्या व्यवस्थापनाने चालू केले असून त्यामुळे इतर संस्था व नागरिक हेही त्यांच्या मनमानी मुळे त्रस्त झाले आहेत.

             उपरोक्त ओमकार शाळेच्या त्रासाबद्दल काही नागरिकांनी येथील माजी नगरसेवक श्री.भालचंद्र म्हात्रे यांच्याकडे तक्रारी केल्या असून श्री. भालचंद्र म्हात्रे यांनी माहिती अधिकारात या शाळेला मिळालेले भूखंड व इतर माहिती बद्दल एमआयडीसीकडे माहिती मागितली असता एमआयडीसीने शाळेला एकूण पाच प्लॉट दिल्याचे माहिती मिळाली आहे. तरी या शाळेची हौस पूर्ण न झाल्याने त्यांनी इतर दुसर्‍या संस्थेच्या ताब्यात असणारे आपल्या शाळे शेजारील प्लॉट हे आपल्या आर्थिक व राजकिय बळावर घेण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. तसे पत्र त्यांनी उद्योगमंत्री यांना देवून मागणी केली आहे. शिवाय या शाळेच्या एका भूखंडावर नवीन इमारत बांधण्याचे काम चालू असून सदर इमारतीच बांधकाम अपूर्ण असतानाही त्यामध्ये शाळेचे वर्ग भरवले जात होते. याबद्दल या इमारतीला बीसीसी आणि भोगवटा प्रमाणपत्र ( BCC & Occupancy Certificate ) मिळाले आहे का ? अशी माहिती श्री. भालचंद्र म्हात्रे यांनी विचारली असता निरंक ( नाही ) असे उत्तर एमआयडीसी कडून देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी हा खेळ चालू असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे माहिती अधिकारात श्री भालचंद्र म्हात्रे यांनी अर्ज दाखल करताच त्यानंतर काही दिवसातच श्री. म्हात्रे यांना त्यांच्या मोबाईलवर शाळा व्यवस्थापनाकडून फोन येवून तुम्ही आमच्या शाळेबद्दल काही माहिती अर्ज सादर केला आहे का अशी विचारणा केली गेली. एक प्रकारे त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे ही माहिती अधिकारातील गोपनीय माहिती शाळा व्यवस्थापनाला कशी मिळाली याचे उत्तर एमआयडीसी कडून दिले गेले पाहिजे. 

सदर शाळेवर शिक्षण विभाग, केडीएमसी, एमआयडीसी यांच्याकडून कार्यवाही व्हावी असे सर्व स्तरांतून मागणी होत आहे.

Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image