राजापूर आयटीआयमध्ये मानधन तत्वावर टंकलेखन लिपिक पदासाठी १५ एप्रिलपर्यंत अर्ज करावेत

 रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी 

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजापूर येथे केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत संस्था व्यवस्थापन समिती (IMC) च्या कामाकाजाकरिता तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर टंकलेखन लिपिक (Data Entry Operator) नेमण्याचे आहे. तरी गरजू उमेदवारांनी संस्थेच्या पत्त्यावर 15 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करावेत, असे आय.एम.सी. ऑफ आय.टी.आय राजापूरचे सचिव टी.एस. मिसाळ यांनी केले आहे.*

        पदाचे नाव- टंकलेखन लिपिक, वय वर्षे  २१ ते ३८ वर्षापर्यंत, किमान वाणिज्य शाखेतील पदवी, संगणक ज्ञान, टॅली, टंकलेखन मराठी-इंग्रजी, ऑनलाईन कामकाज हातळण्याचे ज्ञान ही शैक्षणिक अर्हता आवश्यक, किमान २ वर्षाचा शैक्षणिक अर्हतेनुसार अनुभव आवश्यक. दरमहा १२ हजार रुपये  व ५% वार्षिक दरवाढ असे वेतन असेल.

अटी व शर्ती 

कार्यालयीन कामकाजाकरीता प्रवास करावा लागेल, ११ महिने नियुक्ती कालावधी व कामकाज समाधानकारक असल्यास पुढील २ वर्षाकरिता प्रत्येकी ११ महिन्याची नियुक्ती, कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारास समान संधी, दरवर्षी ११ महीन्याचे बंदपत्र देणे अनिवार्य राहील. कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याविषयी तरतूद नाही. अनुभव प्रमाणपत्र अथवा सेवेत कार्यरत असलेला कोणताही दाखला अथवा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. उपरोक्त योजना केंद्र शासन पुरस्कृत असल्याने योजना चालू असे पर्यंतच सेवेत कार्यरत ठेवण्यात येईल.


Popular posts
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image