कुंभारखाणी उंब्रटवाडी येथे १२३३५ रुपयाचा देशी विदेशी कंपनीचा दारु साठा जप्त. संगमेश्वर पोलिसांची धडक कारवाई.

 

संगमेश्वर लोकनिर्माण/ सत्यवान विचारे

संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी उंब्रटवाडी येथील राजेंद्र काशीराम सुर्वे (५४) याच्या राहत्या घरी रविवार ता, 6 रोजी संlयकाळी संगमेश्वर पोलिसांनी रेड केली असता त्याच्या  घराच्या पडवी मधे  १२३३५ रुपयाचा देशी विदेशी कंपनीचा दारु साठा आढळून आला.

संगमेश्वर पोलिसांच्या या धडक कारवाई गेली कित्येक दिवस अवैध्य रित्या सुरु असलेल्या दारु धंद्याला आळा बसल्याने संगमेश्वर पोलिसांचे विशेषतः परि, पोलीस उप अधीक्षक श्री, शिव प्रसाद पारवे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन होत आहे.

या विषयी मिळालेल्या माहिती नुसार  कुंभार खाणी उंब्रटवाडी येथे  विना परवाना देशी विदेशी,  दारु विक्री होत असल्याची खबर संगमेश्वर पोलिसांना मिळाली असता रविवार ता, 6 रोजी संयकाळी 6.5 मी. संगमेश्वर पोलिसांनी एका घरावर रेड केली. त्यावेळी  राजेंद्र काशीराम सुर्वे हा आपल्या राहत्या घराच्या पडवी मधे देशी, विदेशी दारूची विक्री करताना आढळून आला.

संगमेश्वर पोलिसांनी पंचांसमक्ष (टोटल १२३३५ रुपयाचा मुद्देमाल जप्त ) सर्व मुद्देमlल ताब्यात घेतला आहे.

या संबंधि संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पो, ना,श्री, सोमनाथ विश्वानाथ आव्हाड यांनी रीतसर फिर्याद दिल्याने राजेंद्र याच्यावर विना परवाना देशी, विदेशी मलाचा साठा करणे आणि विक्री करणे  या कारणास्तव संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणेत आला आहे.

या बाबत अधिक तपास परि, पोलीस उप अधीक्षक श्री, शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शना खाली पो, उप, नि, श्री, सी,टी, कांबळे करीत आहेत.

गेली दोन महिने अवैध धंद्या विरोधात संगमेश्वर पोलिसांनी केलेली कारवाई ही खरोखर कौतुकास्पद असल्याचे बोलले जात असुन संगमेश्वर पोलिसांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.