न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी, ३१ तास चाललेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेत हजारो भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला

 

मुंबई लोकनिर्माण (शांताराम गुडेकर )

  

     महाराष्ट्राला तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे. या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत त्यापैकी जे. एन. पी. टी बंदर घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे .गावदेवीची यात्रा चैत्र शुद्ध कृष्ण पक्ष-१ रविवार दि.१३ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झाली. तर  पालखी सोहळा सोमवार दि. १४ एप्रिल २०२५ रोजी थाटामाटात पार पडला.अनेक गावामधील ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेतले व हजारो भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला .पालखी सोहळा यावर्षी ३१ तास चालला होता.ग्रामस्थांनी जत्रेची विशेष तयारी केली होती.तसेच हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी  ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

ग्रामसुधारक मंडळ न्हावे कमिटीचे श्री. विजेंद्र गणेश पाटील (सरपंच),शैलेश विठ्ठल पाटील (उपसरपंच),योगेश कुंडलीक पाटील (अध्यक्ष),जयेंद्र जनार्दन पाटील (उपाध्यक्ष),निलेश हरिश्चंद्र भोईर (उपाध्यक्ष),विनोद एकनाथ पाटील (उपाध्यक्ष),सतीष दत्ताराम भोईर (उपाध्यक्ष), प्रेमनाथ नामदेव म्हात्रे (खजिनदार),अनंत लहु म्हात्रे (सहखजिनदार),चंद्रकांत बालाराम पाटील (सहखजिनदार),सदानंद पाटील - (सहखजिनदार),मनोरथ लक्ष्मण कडू - (सहखजिनदार)आणि सदस्य, सभासद तसेच संबंधित अन्य पदाधिकारी,हिरालाल हरि पाटील, दीपक पाटील,सुहास पाटील,रामनाथ पाटील आणि ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली.तसेच पालखी सोहळ्यांसाठी मुंबई, ठाणे व पनवेल तसेच उरण तालुक्यातील आगरी-कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहीले होते. गावदेवीचे देऊळ गावकऱ्यांच्या सहभागाने बांधण्यात आले आहे. ही देवी नवसाला पावते म्हणून महाराष्ट्र व परराज्यातूनही अनेक भाविक येथे दर्शनाला येतात. गावदेवीची प्रसन्न व लोभसवाने रुप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळे भरून पाहावे .सर्व भक्तांनी आरोग्य,सुख,शांती प्रदान करण्याची विनंती देवीला केली असे सदर गावचे सुपुत्र अशोक दामू भोईर यांनी बोलताना सांगितले.

Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image