राज्यात दस्त नोंदणी हाताळणी शुल्कात दुप्पट वाढ


मुंबई लोकनिर्माण न्युज टीम

कोणत्याही मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी राज्यात आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. राज्य सरकारने मुद्रांक शुल्क विभागामार्फत आकारल्या जाणाऱ्या दस्त हाताळणी शुल्कात प्रति पान २० रुपयांवरून थेट ४० रुपये अशी दुप्पट वाढ केली आहे.

नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या कागदपत्रांच्या स्कॅनिंग आणि हाताळणीसाठी यापूर्वी प्रति पान २० रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र, राज्य शासनाने आता या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, नवीन दर प्रति पान ४० रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.नोंदणी मुद्रांक विभागाच्या म्हणण्यानुसार, वाढलेली उपनिबंधक कार्यालये, संगणकीकरणाचा वाढता व्याप, ३५ विविध प्रणाली, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि नेटवर्क देखभाल खर्चामुळे विभागाचा परिचालन खर्च वाढला आहे. कुशल मनुष्यबळावरील खर्चही वाढला आहे, त्यामुळे ही शुल्कवाढ करण्यात आल्याचे संकेत आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे घर खरेदीदार आणि इतर मालमत्ता व्यवहार करणाऱ्या नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. नुकतीच नोंदणी शुल्कात वाढ झालेली असताना, हाताळणी शुल्कातही वाढ का करण्यात आली, असा प्रश्न 'असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स'ने उपस्थित केला आहे.

राज्य सरकारला दस्त नोंदणीतून सरासरी दरमहा सुमारे ४००० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. आता या हाताळणी शुल्कातील वाढीमुळे सरकारच्या तिजोरीत आणखी भर पडणार आहे. या दरवाढीमुळे नेमकी किती महसुली वाढ होईल, याची आकडेवारी लवकरच उपलब्ध होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Popular posts
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image