सुप्रसिद्ध ऐतिहासिक श्रीराम मंदिरात " राम नवमी उत्सव " भक्तिमय वारावरणात संपन्न..

 

रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी 

ऐतिहासिक श्रीराम मंदिर श्रीराम आळी येथे श्रीराम नवमी उत्सव गुढीपाडव्यापासून सुरू होतो. या दिवसापासून पुढे रामनवमी व दुसऱ्या दिवशी महाप्रसाद व रात्री लळीताने या उत्सवाची सांगता होते. 

गुढीवाडव्या पासून रामनवमी पर्यंत भजन, कीर्तन प्रवचन इत्यादी धार्मिक कार्यक्रमात हा उत्सव संपन्न होतो. यावेळी सुद्धा श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम महिला, बंधू भगिनी व शेकडो रामभक्तांच्या उपस्थितीत ढोल ताशाच्या गजरात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

संध्याकाळी पाच वाजता प्रभू श्रीरामचंद्र सवाद्य वाजत गाजत भक्तांना दर्शन देण्यासाठी नगर प्रदक्षिणेस पालखी रथातून बाहेर निघाले.

नगारा गाडी, खऱ्या अश्वावर आरूढ झालेली झाशीची राणी, श्री हनुमान, हत्ती, श्रीरामाची पालखी, रथ व विविध चित्ररथ यासह सडा मिऱ्या, जाकी मिऱ्या येथील दोन ढोल पथके, फटाक्यांची आतषबाजी, शिवरुद्रा ढोल पथक पालखी बाजा व बँड यांच्या गजरात मोठया उत्साहात असंख्य रामभक्तांच्या उपस्थितीत श्रीरामाची मिरवणूक संपन्न झाली.

मिरवणुकीत सहभागी असलेल्या श्रीराम भक्तांना ठिकठिकाणी काही मंडळांच्या वतीने कोल्ड्रिंक्स, कोकम - आवळा सरबत तसेच सामोसा, लाडू  इत्यादी चे वाटप करण्यात आले. 

दरवर्षी प्रमाणे ना. उदय सामंत यांनी मंदिरात येऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे, भूतपूर्व जिल्हा न्यायाधीश दिलीप जामखेडकर इत्यादी मान्यवरांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले.

मा. पोलीस अधीक्षक धंनजय कुलकर्णी  यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाणे व शहर वाहतुक नियंत्रण कक्षाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्सव सुरू झाल्या पासून ते मिरवणूक संपेपर्यंत उत्कृष्ट नियोजन करून संपूर्ण उत्सवाला सहकार्य केले.

दरवर्षीप्रमाणे आज दुपारी साडेबारा पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 

आज रात्री प्रथेनुसार धार्मिक कार्यक्रम पालखी भोवत्या व लळीताच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होणार आहे.