चिपळूण/ लोकनिर्माण (संतोष शिंदे)
चिपळूण तालुक्यातील कादवड मधील ग्रामस्थांनी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली. संपुर्ण भारत देशात सर्व जनतेला प्रेरणा देणारा १४ एप्रिल हा दिवस म्हणजे प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये ऊत्साह निर्माण करणारा दिवस आणि या दिवसाचे औचित्य साधून कादवड गावातील ग्रामस्थानी बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. या कार्यक्रमाची सुरूवात ध्वजारोहण करुन करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी गावातील अशोक कदम, सिध्दांर्थ मोहिते, संजय कदम, दीपक मोहिते, निलेश मोहिते, अशोक मोहिते, अभिजीत मोहीते, सुशांत मोहिते, त्याच बरोबर महिला कार्यकर्त्या दिपाली मोहीते, शिल्पा मोहीते, अर्चना कदम, दिक्षा मोहीते, प्रणाली गमरे, भिमा मोहीते, रंजना मोहीते, राधिका गमरे या महिला उपस्थितीत होत्या.