रेडी रेकनर दरात दोन वर्षांनी वाढ; महानगरपालिका क्षेत्रात ५.९५ %तर ग्रामीण भागात ३.३६% वाढ, आजपासून नवे दर लागू

मुंबई लोकनिर्माण न्युज टीम 

आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारने रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात 5.95% (मुंबई वगळता) एवढी वाढ करण्यात आली आहे.

तर ग्रामीण भागात 3.36% वाढ करण्यात आली आहे.

प्रभाव क्षेत्रात 3.29%, नगरपरिषद / नगर पंचायत क्षेत्र 4.97%, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र सरासरी वाढ 3.39% अशी वाढ करण्यात आली आहे. 

ही वाढ पाहता राज्यात सरासरी 4.39% (मुंबई वगळता) व राज्याची एकूण रेडीरेकनर दरातील वाढ ही 3.89% करण्यात आली आहे.

सन 2017-18 साली वार्षिक रेडी रेकनर रेट तयार करणेत आले होते. त्यानंतर सलग 2 वर्षे स्थावर मिळकत क्षेत्रातील मंदीचा विचार करुन (सन 2018-19 व 2019-20) साठी सदर दर कायम ठेवण्यात आले होते. 

यानंतर कोरोना संकटामुळे विचार करून हे दर कमी प्रमाणात वाढविण्यात आले होते. ते पुढे 2022-23 मध्ये वाढविण्यात आले. तसेच हेच दर पुढील दोन वर्षे म्हणजे 2024-25 करिता कायम ठेवण्यात आले होते.

Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image