मुंबई लोकनिर्माण (रामदास धो. गमरे)
अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंती पर्वाचे औचित्य साधून विनामूल्य लकी ड्रॉ चे आयोजन करून लकी ड्रॉ च्या माध्यमातून १३४ स्पर्धकांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी निर्माण केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १३४ स्पर्धकांना अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत, त्यात प्रथम बक्षीस २ व्यक्तींसाठी वर्षातून ३ वेळा L D रिसोर्टची सहल, द्वितीय बक्षीस २ व्यक्तींसाठी वर्षातून २ वेळा L D रिसोर्टची सहल, तृतीय बक्षीस २ व्यक्तींसाठी वर्षातून १ वेळा L D रिसोर्टची सहल व इतर १३१ आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे, सदर विनामूल्य लकी ड्रॉ चे लकी कूपन दि. ११ एप्रिल ते १९ एप्रिल २०२५ पर्यंत अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान, मुंबई जिल्हा कार्यालय, सावित्रीबाई फुले वसाहत भोईवाडा, बेस्ट कर्मचारी वसाहत शेजारी येथे उपलब्ध होतील व या लकी ड्रॉ ची सोडत मंगळवार दि. २२ एप्रिल २०२५ रोजी रात्रौ ८:०० वाजता होईल, तरी जास्तीत जास्त लोकांनी या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होऊन बक्षिसे जिंकण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष अमोल वंजारे व अध्यक्ष मुंबई जिल्हा संदीप मोहिते यांनी अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केले आहे.