राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीला २०२४/२५ या आर्थिक वर्षात विक्रमी असा २ कोटी ६५ लाखांचा ढोबळ नफा
QR CODE, मोबाईल बँकिंग ॲप, मोबाईल ॲपद्वारे पिग्मी कलेक्शन, मिस्ड कॉल सर्व्हिस आय एम पी एस, यू पी आय मर्चंड, पॅन व आधार व्हेरिफिकेशन खाते उघडणे या सेवा लवकरच सुरू करण्यात येणार
पतपेढीच्या ३ शाखांची शंभर टक्के कर्ज वसुली, ५ शाखांची ९९.५० टक्के कर्ज वसुली
रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी
राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्यादित राजापूर या संस्थेला सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात विक्रमी असा दोन कोटी ६५ लाखाचा ढोबळ नफा झाला आहे कोअर बँकिंग प्रणाली द्वारे तत्पर व विनम्र सेवेद्वारे लोकाभिमुख कामकाज करताना संस्थेने सभासदांचा विश्वास वाढवला आहे.
संस्थेच्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील मार्च २०२५ अखेर संपत्तीची स्थिती खालील प्रमाणे
सभासद १४,४३८, वसूल भाग भांडवल चार कोटी अकरा लाख, निधी सात कोटी नऊ लाख, ठेवी ७७ कोटी ९५ लाख, कर्ज ५४ कोटी २७ लाख, गुंतवणूक ४६ कोटी ४९ लाख, खेळते भाग भांडवल १०५ कोटी ५५ लाख, एकत्रित व्यवसाय १३२ कोटी २२ लाख, ढोबळ नफा २ कोटी ६५ लाख, आणि निव्वळ नफा १ कोटी ५८ लाख
संस्थेच्या कामकाजाची दखल घेऊन संस्थेला अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इन्मा यांचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा बँक ऑफ पुरस्कार सलग सात वर्षे मिळाला आहे. पतपेढीच्या तीन शाखांची कर्ज वसुली १००% इतकी झाली असून पाच शाखांची कर्ज वसुली ९९.५०% इतकी झाली आहे. संस्थेच्या वतीने आरटीजीएस, एम इ एफ टी, एसएमएस अलर्ट, मिनी एटीएम सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. संस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार सलग पाच वर्षे प्राप्त झाला आहे. कोकण पतसंस्था फेडरेशन यांचा कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार असे मानाचे पुरस्कारा प्राप्त झालेले आहेत.
सदर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर यांनी दिली आहे.