ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन!

मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी 

मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले आहे. आज मीरारोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. ‘वादळवाट’, ‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’ यांसारख्या लोकप्रिय मालिका आणि अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. 

काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता, तरीही त्यांनी जिद्दीने या आजारावर मात करत पुन्हा काम सुरु केले होते. 

त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. 

शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image