रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी
रत्नागिरीत अतुलित बलधाम येथे शनिवार दिनांक १२/४/२०२५ रोजी सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या कृपेने आणि 'श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट' च्या मार्गदर्शनाने श्री हनुमान पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या दिवशी सकाळी १० वाजता अश्वस्थासहित श्री हनुमंतशिळेचे पुजन, ११ वाजता पंचमुखी श्री हनुमंतासमोर अखंड पठण.
१) श्री हनुमंत तारक मंत्र ५४ वेळा
( ओम श्री रामदुताय हनुमंताय
महाप्राणाय महाबलाय नमः)
२) पंचमुख हनुमत्कवच
३) संकटमोचन श्री हनुमान स्तोत्र
*सकाळी ११.३० ते रात्री ८.३० पंचकुंभाभिषेक आणि रात्री १० वाजता पुर्णाहुती* असे कार्यक्रम होणार असून जास्तीत जास्त श्रद्धावान आणि भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.