कर्जी बिटच्या शिक्षण विस्तार अधिकारीपदी बाबाजी शिर्के

 

 लोटे लोकनिर्माण प्रतिनिधी 

लोटे केंद्राचे केंद्रीय प्रमुख श्री. बाबाजी जयराम शिर्के यांची खेड तालुक्यातील कर्जी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नेमणूक झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

लोटे केंद्राचे आदर्श , क्रियाशील व्यक्तिमत्व , शिक्षण क्षेत्रातील एक जाणकार  व अनुभवी, ज्यांनी ३९ वर्ष शिक्षण सेवेमध्ये वाहून निरंतर असे शैक्षणिक काम केले ते तसेच संघटनात्मक काम करताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे रत्नागिरीचे जिल्हाध्यक्षपद भूषविलेले,रत्नागिरी जिल्हा केंद्रीय प्रमुख संघटनेचेही जिल्हाध्यक्षपद ज्याने भूषविले,तसेंच रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण समितीमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून ज्यानी उत्तम प्रकारे काम केले.  प्रशासन व शिक्षक संघटना यांच्यात योग्य समन्वय घडवून  शिक्षणाला योग्य दिशा देण्यासाठी ज्यांनी मोठे योगदान दिले आहे असे आदर्श  नेतृत्व ज्यानी संघटनेमध्ये अनेक क्रियाशील कार्येकर्ते घडविले असे सर्वांचे मार्गदर्शक विद्यार्थी व शिक्षक प्रेमी आदर्श ,लोटे केंद्राचे केंद्रीय प्रमुख श्री. बाबाजी शिर्के यांची खेड तालुक्यातील कर्जी बीटचे विस्तार अधिकारी म्हणून नेमणूक झाल्याबद्दल त्यांचे  अभिनंदन होत आहे.

 त्यांनी शिक्षण क्षेत्रात पदार्पण करताना  शिक्षक ही नोकरी नव्हे तर सेवा म्हणून काम केले. शिक्षण क्षेत्रात उपशिक्षक केंद्रीय प्रमुख व विस्तार अधिकारी असा त्यांचा प्रशासनातील चढता आलेख राहिलेला आहे.

  दातृत्व, कर्तुत्व आणि नेतृत्व हे तीनही गुण ज्यांच्याकडे आहेत असे अनोखे असे व्यक्तिमत्व.

 लोटे केंद्रात शैक्षणिक काम करत असताना शिष्यवृत्ती परीक्षा  या स्पर्धकात्मक परीक्षेमध्ये स्पर्धेच्या युगात आपली मुले टिकावी त्यासाठी मुलांना चांगले असे मार्गदर्शन मिळावे म्हणून केंद्रातील निवडक शिक्षकांकडून  शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन मिळण्यासाठी वर्षभराचे नियोजन करत. विद्यार्थ्यांना परीक्षांचा सराव मिळावा  म्हणून  वर्षभरात अनेक सराव परीक्षांचं आयोजन केले.त्या खर्चाचा बोझ विद्यार्थी, पालक व शिक्षकांवर कधीही पडू न देता उपक्रम राबविला. त्यांच्या या कार्याला यश येऊन केंद्रातील अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. सार्थक, सोहम, प्रणव, ओंकार  यासारखे विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादी त आलेत.

  नवोदय विद्यालय मध्ये सुद्धा सार्थक ओंकार यांची निवड झाली होती.

 जाणू विज्ञान अनुभव विज्ञान या जिल्हा परिषदेच्या अभिनव अशा उपक्रमामध्ये सहभाग घेताना आपल्या केंद्रातील  मुलांची निवड नासा व इस्रो या भेटीसाठी व्हावी यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम राबवून stem संस्थेकडून मार्गदर्शन मुलांना मिळवून दिले. शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये पुणे, दापोली येथून तज्ञ मार्गदर्शक बोलावून   त्यांचे मार्गदर्शन मिळवून दिले. केंद्रातील चार मुलांची नासा इस्रो भेटीसाठी जिल्ह्यातून निवड झाली.

 शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून प्रत्येकाकडे असणारे गुण जाणून घेऊन त्याच्याकडे असणाऱ्या  गुणांचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करून घेतला. त्यांच्याच कारकीर्दीत  त्यांच्याच केंद्रातील तीन शिक्षकांना  जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. 

    त्यांनी त्यांच्या केंद्रामध्ये राबवलेला एक आदर्श उपक्रम म्हणजे शिक्षकांच्या कामाची दखल घेऊन वर्षभराच्या कामगिरीनंतर केंद्रातील दोन शिक्षकाना आदर्श केंद्रीय पुरस्कार  हा उपक्रम राबविला.त्याचा खर्च ते स्वतः करत असत.

  लोटे केंद्रातील शैक्षणिक चैतन्य निर्माण करण्याचा एक विशेष काम त्यांनी केले. शिष्यवृत्तीत गुणवत्ता यादीत चमकलेले विद्यार्थी, नवोदयामध्ये निवड झालेली विद्यार्थी, नासा, इस्रो  भेटीसाठी निवड झालेली विद्यार्थी तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान बँड पथकासह लोटेमाळ शाळा ते पीरलोटे धामणदेवी शाळेपर्यंत मिरवणूक काढून केला.जिल्हा परिषद शाळेचा दर्जा खाजगी शाळेपेक्षा कमी नाही हे परिसरातील समाजाच्या निदर्शनास आणून दिले.कंपन्यांच्या कडून अनोख्या अशा देण ग्या मिळवून शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या . डाऊ केमिकल सायन्स या कंपनीकडून तीन लाख रुपये देणगी  घेऊन   १०० विद्यार्थिनी एकाच वेळेला दत्तक घेण्याचे अविस्मरणीय असं कार्य त्यांनी केले आहे.

 आज त्यांची कर्जी बीटचे विस्तार अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेकडून नेमणूक झाली आहे. त्यांच्या या कार्याचा हा एक प्रकारे गौरवच आहे. त्यांना त्यांच्या बीट मध्ये कार्य करण्यास आणखी शक्ती प्राप्त होवो. यासाठो त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image