मुंबई लोकनिर्माण न्युज टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या भेटीत राज्यातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या 'अन्यायावर ' चर्चा झाली.
राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की,.इतर भाषांचा आदर करत असताना मराठी भाषेचाही सन्मान झाला पाहिजे.
मंत्री सामंत यांनीही या भूमिकेशी सहमती दर्शवत, बँकांमध्ये मराठीतून व्यवहार होण्यासाठी लवकरच ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
त्यामुळे आगामी काळात बँकांना मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक होण्याची शक्यता आहे.