रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री,कोकणचे भाग्यविधाते,रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.नारायणराव राणे यांचा वाढदिवस रत्नागिरीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.वाढदिवसाच्या औचित्याने भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने जिल्हा बाल कल्याण समितीच्या ना.प.अभ्यंकर निरीक्षण गृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न आणि धान्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश चिटणीस सौ. शिल्पाताई मराठे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.वर्षाताई ढेकणे, रत्नागिरी शहराध्यक्ष श्री.राजन फाळके, माजी तालुकाध्यक्ष श्री.मुन्ना चवंडे, जिल्हा पदाधिकारी श्री. उमेश कुलकर्णी, माजी शहराध्यक्ष श्री.सचिन करमरकर, जिल्हा चिटणीस श्री.अशोक वाडेकर, श्री.दादा ढेकणे, सौ.भक्ती दळी, श्री.शैलेश बेर्डे, एकसौ.सायली बेर्डे, श्री.नितीन गांगण तसेच श्री.सुधाकरराव सावंत, सहसचिव श्री.राजन पटवर्धन, अधीक्षक श्री.प्रथमेश वायंगणकर, श्री.विनोद पवार आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व संस्थाचालक सदस्य उपस्थित होते.
खासदार मा.नारायणराव राणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा; रत्नागिरीतील ना.प.अभ्यंकर निरीक्षण गृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न आणि धान्य वाटप
• Balkrishna Kasar

