संगमेश्वरच्या शिवसेना उबाठा गटाला नवसंजीवनी! माजी जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती सहदेव बेटकर उद्या करणार जाहीर पक्षप्रवेश! मातोश्रीवर हालचालींना वेग

संगमेश्वर लोकनिर्माण/ प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजातील तडफदार नेते अशी ओळख असलेले सहदेव बेटकर आता मनगटावर शिव बंधन बांधणार आहेत. ते उद्या ८ एप्रिल २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या तमाम समर्थकांच्या समवेत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात  जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत.

तळागाळातील जनतेपर्यंत आपल्या कामातून ऋणानुबंध जोडणारे मनमिळाऊ नेतृत्व अशी आणखी एक ओळख निर्माण केलेले सहदेव बेटकर यांनी गुहागर मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविली. आपल्या समर्थकांच्या पाठबळावर त्यांनी निकराची झुंज दिली. काही थोड्या मतांच्या फरकाने त्यांना विजयाने हुलकावणी दिली.

सहदेव बेटकर यांच्या शिवसेना उबाठा गटातील प्रवेशाने नक्कीच पक्षाला बळकटी येईल असे जाणकारांचे मत आहे. लवकरच सहदेव बेटकर सक्रिय होतील. सर्वसामान्य शिवसैनिकांना आलेली मरगळ निघून जाईल असा आशावाद यानिमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे.