सोनवडे फाटा ते वाशी नव्याने बांधलेल्या रस्त्यावर एका महिन्यात भले मोठे खड्डे

 संगमेश्वर लोकनिर्माण/ प्रतिनिधी

संगमेश्वर तालुक्यातील मुचरी  येथील सोनवडे  फाटा ते मुचरी घोटल वाडी येथील २ किलोमीटर रस्ता एक महिन्यात उखडला       सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या या रस्ता येत असून गेले महिनाभरात याठिकाणी दुचाकीचे अनेक अपघात घडून आले आहेत. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

       सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  निकृष्ठ कामामुळे या रस्तावर याअनेक ठिकाणी मोठाली भगदाडे पडली आहेत. 



       त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे.गेल्या महिनाभरात याठिकाणी दुचाकी तसेच रिक्षाचे अनेक अपघात घडून आले आहेत. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

    यामुळे मुचरी युवा सामाजिक संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री विलास वामन सुर्वे, उपाध्यक्ष श्री विनोद मिरगळ, श्री खन्देश  कासार, सुरेश महाडिक, संतोष नागलेकर, बाळकृष्ण महाडिक, इम्रान झारी, नीलेश भालेकर, किशोर जाधव, संतोष मोरे, सिराज मापारी, आसिफ मापारी यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बुरंबी येथे रस्ता रोको आणि आमरण उपोषण चे हत्यार उपसले आहे.तसे पत्र बांधकाम विभाग यांना देण्यात आले आहे.