हज यात्रे साठी जाणाऱ्या भाविकांसाठी फाॅरेन ट्रावेल कार्ड उपलब्ध करून द्यावे. समाजसेवक - एजाज इब्जी.

 

रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी 

           स्टेट बँक ऑफ इंडिया ने हज आणि उम्रा साठी जाणाऱ्या भाविकांसाठी सऊदी अरब या देशात वित्तीय व्यवहार करण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर सेवा देण्यास सुरुवात केली आहे. जी भाविकांसाठी खूपच फायद्याची आहे. 

         सऊदी अरब मध्ये होणारे सर्व व्यवहारावर कोणत्याही प्रकारचा सेवा कर आकारला जाणार नसल्याने भाविकांना त्या देशातील चलन ( रियाल ) घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. 

           ही भारतात सर्वात उत्तम सेवा देणारी बाब असून त्याची प्रसिद्धी किंवा कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी होत नसल्याने हज यात्रेकरूंना या बाबत वेळीच माहिती मिळत नाही. आणि या एका चांगल्या उपक्रमाचा जनतेला फायदा होत नाही. 

           त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया ने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाखां मध्ये प्रसिद्धी फळक लावून हज यात्रेकरूंना फाॅरेन ट्रावेल कार्ड तातडीने उपलब्ध करून देण्या बाबत समाजसेवक एजाज इब्जी यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेल पाठवून विनंती केली आहे.

Popular posts
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image