गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्रीराम मंदिर कसबा येथे हनुमानाच्या मूर्तीची स्थापना
दिवा येथील श्री. सदाशिव पाटील यांनी स्वच्छने दिली होती श्री हनुमानाची मूर्ती.
श्री प्रभुराम यांच्या जन्मोत्सव दिनी श्री. पाटील यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार
संगमेश्वर लोकनिर्माण/ सत्यवान विचारे
कसबा येथील श्रीराम मंदिर हे पौराणिक असुन कित्येक वर्ष ते दुर्लक्षित होते. हे मंदिर संगमाच्या मंदिरा शेजारी असुन ते १९८४ महापुरात फक्त गाभाऱ्याची घुमटी वगळता मधे पूर्णतः गlडले गेले होते.
सुमारे वीस वर्षा पुर्वी खेड तालुक्यातील कोतवली गावचे शिक्षक आणि कसबा गावचे जावई श्री. श्रीकांत बेडेकर आणि कसबा गावचे सुपुत्र श्री. बाळ काका जोशी (मध्यंतरीच्या काळात बाळ काका जोशी यांचे निधन झाले.)यांनी या मंदिरा भोवतीचे उत्तखंनं करून या मंदिराला मोकळे केले, मंदिर पूर्णतः उद्वस्त झालेले असल्याने या जोड गोळीने आपल्या स्व खर्चाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि सर्व भाविकांसाठी हे मंदिर खुले केले होते. या मंदिरात सना वारीला ग्रामस्थांच्या मदतीने अनेक छोटे मोठे कार्यक्रम होऊ लागले.
तर बाळ काका जोशी आणि बेडेकर गुरुजी यांनी मंदिराच्या सभागृहात अल्प दरात लग्न, मुंज, साखरपुडा आदी कर्यक्रम सुरु केले, त्या मिळणाऱ्या पैश्यातून मंदिराच्या परिसरlचे सुशोभीकरण करून अनेक सुधारणा केल्या.
काही जणांची लग्न एकही पैसा न घेता स्व खर्चाने लावून दिली. अल्पवाधित या मंदिराची चर्चा पूर्ण तालुक्यात झाली.
नुकतेच या भागाला गडकिल्ले सवर्धनच्या टीमने भेट दिली होती. ते सर्वजण या मंदिरात तीन दिवस वस्तीला होते. त्यांनी श्री. संगमेश्वराच्या मंदिराचा परिसर स्वच्छ करून तेथील ढसाळलेली तटबंदी अंग मेहनतीने बांधून दिली होती ( त्यांची सर्व जबाबदारी अर्थातच सरोदे, बेडेकर गुरुजी यांनी स्वीकारली होती.)
त्या वेळी या टीम मधे सहभागी असलेले श्री. सदाशिव पाटील (रा, दिवा जि, ठाणा मlतरंडी गाव ) यांना या राम मंदिरात श्री. हनुमानाची मूर्ती नसल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत श्रीकांत बेडेकर यांच्या कडे चौकशी केली असता श्री. हनुमानाची मुर्ती चोरीला गेल्याचे समजले .
श्री. प्रभू रामचंद्रlच्या मंदिरात पवन पुत्र हनुमानाची मूर्ती नसल्याचे समजताच श्री. पाटील यांनी स्वखर्चाने श्री हनुमानाची छोटीशी मात्र सुबक देखणी अशी मूर्ती आणून ती बेडेकर गुरुजी यांच्याकडे सुपूर्द केली असता, गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्रीराम मंदिरात त्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करणेत आली.
श्री. सदाशिव पाटील यांनी या मंदिरासाठी साक्षात हनुमानाची मूर्ती दिल्याने या मंदिराला खऱ्या अर्थाने पूर्णत्व लाभले हे जाणून श्री प्रभु राम जन्माचे औचित्य साधून या मंदिराचे विश्वस्थ श्री. बेडेकर आणि कसबा ग्रामस्थ यांनी श्री. पाटील यांचा सत्कार केला आणि त्यांना धन्यवाद दिले, जेणे करून प्रभु रामचंद्र यांनीच सदाशिव पाटील यांना प्रेरणा देऊन आपल्या सेवकाला म्हणजे श्री हनुमंताना बोलावून घेतले असे बोलले जात आहे.