एक निस्वार्थी समाजसेवक --शरद भावे* "कोरोना योध्दा" म्हणून भावे यांचा अनेक संस्थांकडून गौरव  

 



   [ रत्नागिरी जिल्हातील दापोली  तालुक्यातील मु.शिरसेश्वर येथील सुपूत्र मुंबई घाटकोपर पश्चिम  येथे वास्तव्यास असणारे समाजसेवक शरद लक्ष्मण भावे अतिशय दिलदार,निस्वार्थी,कष्टाळू, भितभाषी,मनमिळावू  आहेत.दापोली  तसेच कुणबी समाजामध्ये  ते लोकप्रिय आहेत.अशा सर्वगुणसंपन्न,प्रतिभाशाली गरजवंतांच्या हाकेला घरच्या माणसासारखा धावून जाणारा जनसेवक शरद भावे म्हणजे एक आदर्शवत जीवन मानावे लागेल.अशा या प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या चैतन्यमय व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रमाणित प्रयत्न ....]


         दापोली तालुक्यातील निसर्गरम्य  पर्यटकांसाठी सुप्रसिद्ध असलेले शिरसेश्वर गावातील  शरद भावे यांची ओळख खरं तर कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा विक्रोळी -घाटकोपर यांच्या होणाऱ्या अनेक कार्यक्रमांमुळे झाली.शरद भावे यांच्यासहवासाने आम्हाला खूप चांगल्या  माणसांचा सहवास लाभला हे विसरुन  चालणार नाही.शरद भावे यांचे कार्य सर्वसामान्यनांना न्याय/हक्क मिळाला म्हणून असुन हजारो नागरिक त्यांच्या सेवेचा लाभ घेत आहेत.
     शरद भावे  यांचा जन्म शिरसेश्वर येथे १/६/१९६९ रोजी झाला.शरद भावे  लहान पणापासूनच शिक्षण,सामाजिक ,सांस्कृतिक ,क्रिडा या क्षेत्रात हुशार होते.खेळातून,अभ्यासातून तर शाळेत शिक्षक,विद्यार्थीवर्गाचा आवडता होते .प्राथमिक/माध्यमिक शिक्षण गावी करुन त्यांनी महाराष्ट्र ज्युनिअर काँलेज दादर या काँलेजमधून १२ वी(काँमर्स) पर्यंतचे शिक्षण घेऊन नोकरी पत्करली.मुंबईत असतानाही  शरद भावे  यांना ग्रामीण भागातील समस्या जाणवत होत्या.त्यामध्ये बेकारी,स्थानिक  महिलांना रोजगार,शिक्षणाची होणारी गैरसोय इ.बाबींचा समावेश होता.त्यासाठी काहीतरी करण्याची भावे यांची धडपड आहे. भावे कै.सौ.सावित्रीबाई भागोजी निमदे सहकारी पतसंस्था (मर्याका.),कै.सौ.सावित्रीबाई भागोजी निमदे चँरिटेबल ट्रस्ट (रजि.),शिरसेश्वर ग्रामविकास मंडळ(रजि.)मुंबईचे सरचिटणीस तर कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा दापोली,शिवाजी स्पोटर्स क्लब(रजि.)मुंबई,लोकसेवा सहकारी संस्था मर्यादित ,भोलेनाथ तरुण उत्साही मंडळ(रजि.)मुंबईचे अध्यक्ष पदी कार्यरत आहेत.आपण ज्या समाजात आपण जन्म  घेतला त्या समाजाचे आपण काही तरी देणं लागतो याचे भान शरद भावे  यांना आहे.त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.समाजाची सेवा करणे हे जणू काही आपले आद्य कर्तव्य ठरावे,समाजाची सेवा करण्याचे भाग्य प्रत्येकाच्या नशिबी असते असे नाही.पण भावे  यांना कुणबी सामाज यांच्या माध्यमातून  लाभले.गेली ३० वर्षे  ते शैक्षणिक ,कला,क्रिडा,सांस्कृतिक ,पर्यावरण या क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेषतः ग्रामविकासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.गावात नळपाणी योजना राबवणे,कच्चे रस्ते डांबरीकरण करुन घेणे,स्ट्रिटलाईट बसवणे,शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणे आदी कामात ते अग्रेसर आहेत.धरणग्रस्तांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोढून त्यांना योग्या ती मदत मिळवून देण्यात भावे यांचा सिंहाचा वाटा आहे.विविध संघटनांमध्ये त्यांनी कार्याध्यक्ष ,सचिव अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. संपर्क प्रमुख असल्याने शहरी व ग्रामीण भागात ते उल्लेखनीय काम करत आहेत. ग्रामीण/शहरी यामध्ये असलेली दरी भावे संपर्क प्रमुख झाल्याने दूर व्हायला मदत झाली आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन /नियोजन करणे भावे यांना खूप चांगले जमते.भावे यांनी लोकसेवा सहकारी संस्था मर्यादित स्थापन करुन मुंबईसह कोकणात समाजसेवेला सुरुवात केली.घाटकोपर पश्चिम विभागातील भीमनगर भागात(वार्ड क्र.१२७)वास्तव्यास असून कोणत्याही सरकारी पदावर नसतानाही विभागातील गरजूंच्या हाकेला घरच्यांसारखे धावत जाऊन होईल तितकी मदत करतात.विभागातील लोकांना भेडसावणा-या समस्येबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करुन सातात्याने पाठपुरावा करतात.ती समस्या जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यत भावे शांत बसत नाहीत.घाटकोपर विभागांमध्ये रिक्षाचालकांकडून दादागिरी केली जाते.शिवाय भीमनगर व डोंगराळ परिसरात ये-जा करण्यास रिक्षाचालक तयार नसतात.त्यामुळे या विभागातील शालेय विद्यार्थीवर्ग,अपंग ,जेष्ठ नागरिक,गरोदर महिला तसेच आजारी व्यक्तीला खूपच त्रास सहन करावा लागत होता.त्याला पर्याय म्हणून शरद भावे यांनी लोकसेवा सहकारी संस्था मर्यादित तर्फे घाटकोपर स्टेशन ते भीमनगर ,भट्टवाडी मार्गे पुन्हा घाटकोपर स्टेशन अशी सकाळ -संध्याकाळ चार-चार तास विभागातील नागरिकांसाठी मोफत टँक्शी सेवा उपलब्ध करुन दिली होती.या मोफत प्रवास योजनेचा हजारो नागरिक आज लाभ घेत होते.मनसे स्थापनेपासून ते मनसेचे सक्रीय पदाधिकारी आहेत.मनपा वार्ड क्र.१२७ चे शाखाध्यक्ष तर सहा प्रभागात जनहित विभागाच्या संघटक पदी कामही त्यांनी पाहिले आहे.मुंबईसह दापोली येथे अनेक लोकप्रतिनिधींना निवडणूकीत मदत करत विजयी केले आहे.घाटकोपर परिसरात २५ ठिकाणी मोफत वायफाय सेवाही उपलब्ध करुन दिली होती.अनेकदा दुष्काळग्रस्तांना मदत,विदर्भातील एका शेतकरी कुटूंबीयांना झी २४ तास च्या आवाहनाला प्रतिसाद देत एक लाखाची मदत,कोकणातील मुंबईकरांना गणेशोत्सव काळात सुखाचा प्रवास व्हावा म्हणून ना नफा-ना तोटा तत्वावर १० गाड्यांची सोय,नागरिकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी/त्यांना घडामोडी समजाव्यात म्हणून अनेक वाचनालयांना वर्तमानपत्र देणे,शिवजयंती/साईभंडारा/डाँ ,आंबेडकर जयंती/डाँ.आंबेडकर महापरिनिर्वान दिनानिमित मोफत पाणी/नास्ता वापट,आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन विविध आरोग्य शिबिरे/रक्तदान शिबिराचे आयोजन,विविध क्रिडा स्पर्धेचे आयोजन,विभागातील महिलांचे छोटे -मोठे बचत गट तयार करुन त्यांच्या कुटूंबीयांच्या सक्षम अर्थकारणाला हातभार लागावा म्हणून विशेष सहकार्य,जेष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळावेत म्हणून जेष्ठ नागरिक ओळखपत्र वाटप,अपगांना स्वःताच्या पायावर उभे करण्यासाठी अपंग स्टाँल वाटप,घराडी-मंडणगड येथील स्नेहज्योती अंध निवासी विद्यालाय येथे विद्यार्थीवर्गाला शैक्षणिक साहित्याचे वाटप भावे यांनी केलेले आहे.समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून भावे  जमेल तशी जनसेवा करत आहेत.गावांमध्ये विकासात्मक गोष्टींना चालना देणे,आजारी व्यक्तीला उपचारासाठी योग्य  मार्ग दाखवणे,क्रिडा स्पर्धाचे आयोजन करुन स्वतः  सहभागी  होणे,आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन इ.मध्ये शरद भावे कायम सहभाग घेऊन तो कार्यक्रम यशस्वी करतात.समाजकार्यात सहभागी होताना कुटुंबाकडे थोडे दुर्लक्ष होत असले तरी पत्नी,मुले व मित्रपरिवार त्यांना समजून घेत त्यांच्या या जनसेवेला हातभार लावतात.


          कधीही न थकता हसत मुखाने काम करणे हे शरद भावे यांचे वैशिष्ट्य आहे.हसरा व प्रसन्न चेहरा,निःस्वार्थी ,निगर्वी आणि सदैव मदतीला तयारअसणारे शरद भावे सर्वांनाच आवडतात.कारण नागरी समस्या सोडवणे व लोकोपयोगी उपक्रम राबविणे यासाठी ते विभागात जास्त परिचित आहेत.प्रसंगी सनदशीर/संसदीय मार्गाने लढे देऊन कारवायांना यशस्वीरित्या तोंड देत लोकांच्या अडीअडचणींवर उपाय शोधत ती समस्या मार्गी लावतात.विभागांमध्ये होणारे अपघातांची संख्या लक्षात घेऊन गतीरोधक बसवून घेतले तर ठिकठिकाणच्या कच-याच्या समस्यांवर मात करण्यासाठी स्वःता हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवली.डास-मलेरिया  बचाव होण्यासाठी प्रतिबंधक धूरफवारणी नियमित सुरु केली.रस्त्याची दुरावस्था बघून तात्काळ ते खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करुन ते खड्डे बुजवून घेतले. आजवर यशस्वी झालेल्या समाजसेवकांकडून प्रेरणा घेत अनेकदा त्यांचे कौतुक करतात.अभ्यंगसर त्यांचे आदर्श आहेत.त्यांच्याकडून च सामाजसेवेच्या व्रताची प्रेरणा मिळाली असे भावे सांगतात.आजच्या वेळेला एक व्यक्ती आपल्या बरोबरच्या व्यक्तीचे गुण गाताना फारसे दिसत नाहीत.पण भावे याला अपवाद आहेत.ते सहकारीवर्गाला नेहमी सांगतात की,ध्येय ,तत्त्व ,नियोजन ,चिकाटी ,सहनशीलता,स्वाभिमान याच्याबरोबर कोणतेही काम करण्याची तयारी ठेवल्यास आत्मविश्वास आपोआप येतो.जे-जे लोक निःस्वार्थी भावनेने काम करतात तसेच काम मलाही करायचे असल्याचे भावे कायम सांगतात.त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक संस्थांनी त्यांना राष्ट्रीय/राज्यस्तरीय,स्थानिक पुरस्कार /सन्मानचिन्ह/सन्मानपत्र देऊन गौरव केलेला आहे.जगावर कोसळलेल्या माहामारी कोरोना काळात घाटकोपर पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांना सतत चहा,नास्ता पुरवठा केला.शिवाय गरजवंतान आवश्यक त्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करत आपला विभाग रोगमुक्त ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घेत औषधे फवारणी,जनजागृती केली.इतकेच नाही तर घाटकोपर पोलीस स्टेशन अंतर्गत "कोरोना पोलीस" म्हणून कर्तव्य बजावले.या सर्व समाज कार्याची दखल घेत शरद भावे यांना अनेक नोंदणीकृत संस्था/प्रसिद्धी माध्यम/आरोग्य संघटना/मानवाधिकार संघटना यांच्यावतीने "कोरोना योध्दा" सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.प्रत्येक क्षेत्र असे असते तेथे निःस्वार्थी सेवा करणारी माणसे लागतात.जी आजच्याघडीला दुर्मिळ झालेली आहेत.आणि मग शरद भावे यांच्यासारखी माणसे लाभली की त्यांच्या वेळेचा उपयोग सामाजिक संघटनेसाठी करुन घ्यावा व आपली संघटना सर्वांनच्या सहकार्याने मजबूत उभी रहावी असे वाटते. अनेक मार्गदर्शन करणारी माणसं,माझे नातेवाईकांकडून मिळालेल्या भरभरुन प्रेम व मार्गदर्शन यामुळेच ही जनसेवा करण्याचा मार्ग सापडला असे भावे आपल्या मित्रपरिवार यांना सांगतात.आम्ही सामाजिक भान असलेल्या या शरद भावे यांचे कार्य पाहून इतकेच म्हणू इच्छितो की,


 सूर्याचे तेज येऊ द्या,तुमच्या कर्तृत्वात... चंद्राची शितलता,बहरावी स्वभावात.... कस्तुरीचा सुगंध,दरवळावा सहवासात... मकरंदाचे माधुर्य,असावे मुखात.... शरद भावे या समाजकार्यकर्त्यास पुढील वाटचालीत हार्दिक शुभेच्छा...!



*शांत्ताराम ल. गुडेकर


*(मा.विशेष कार्यकारी अधिकारी- महाराष्ट्र                      शासन)


*वृत्तपत्रलेखक/ पत्रकार


*सदस्य- महाराष्ट्र  हरित सेना,वन विभाग-                           महाराष्ट्र शासन


मोबाईल- ९८२०७९३७५९