पुणे जिल्हातील अनेक व्यापारी व मोठ्या भांडवलदारांना भिशीच्या माध्यमातून  कोट्यावधीचा गंडा.. अनाधिकृत भिशी चालक शेठजी फरार .


पुणे/लोकनिर्माण (विनायक दोरगे)


               


      उरूळी कांचन भागातील एका  शेठजीने पुणे जिल्ह्यातील मोठ मोठे भांडवलदार व्यापारी बागायतदार यांना कमीत कमी पन्नास कोटी रूपयाचा गंडा घालत सहकुटुंब फरार झाला आहे. 
     एक लाख ते पंचवीस लाख असे लाखो रुपयांचा  दर महा भिशी भरणा सुरू असणारे पाचशे  पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समजत आहे. मात्र भिशी भरणा  करणाऱ्या गुंतवणूकदारांपैकी  फक्त पाच जणांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे.
     गुंतवणूकदारांचे असे झाले आहे की तोंड दाबून बुक्क्यांचा मार ..
    फसवणूक केलेल्या शेठने पुर्वीपासुन एक ते तीन वर्षाच्या भिश्या अधी प्रमाणिक पणे चालवल्याने लोकांनाचा विश्वास संपादन केला व अचानक  आपला गाशागुडांळत पोबारा केल्याची चर्चा उरूळी कांचन परिसरात सुरू आहे ..
     कोरोना पार्श्वभूमीवर लॅकडाऊन सुरू झाल्यामुळे भिशीचा जोरात सुरू असलेला धंदा मंदित आला. त्यात भरणा करणारे व्यापारी  उदयोगधंदे बंद असल्या कारणाने भरणा वेळॆत करू नशकल्याने शेठजी चा पुढील भिशींचा भरणा थकु लागल्याने गुंतवणुकदारांचा तकादा मागे लागला पुढील परिस्थितीची चाहुल लागताच शेठजीनी आपला गाशा गुंडाळून सहपरिवार फरार झाला आहे..
      पुणे ते हवेली. दौंड भागातील बडे व्यापारी बागायतदार मोठ्या संख्येने अडचणीत आल्याची चर्चा सुरू झाली आहे ...
पुढील तपास लोणी काळभोर पोलिसस्टेशनचे पोलिस अधिकारी करत आहेत.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image