कोरोना आता तू जा ना ! सुप्रसिद्ध कवी आणि राज्य शासन पुरस्कार विजेते राष्ट्रपाल सावंत


तुझ्या येण्याने येण्याने 
मनशांती ही मिळेना 
स्वास्थ्य बिघडून गेले 
कोरोना आता तू जा ना !


कसा निर्माण झालास  
झटकन रे वाढला 
दहशत फार झाली 
घोर जगाला पडला .
तुझ्या येण्याने येण्याने Sss 


शाळा कॉलेजला सुट्टी 
काम धंदा सारे बंद 
फिरण्या चालण्याला तू 
घातलेस रे  निर्बंध .
तुझ्या येण्याने येण्याने Sss 


झोप नाहीच कुणाला 
वाटे चिंता प्रशासना 
अहोरात्र जागूनीया 
सज्ज आहे रे यंत्रणा .
तुझ्या येण्याने येण्याने Ssss 


जीव मुठीत घेऊन 
माणूस वावरतोय 
जगू दे ना रे आम्हांला 
विनवणी करतोय .
तुझ्या येण्याने येण्याने Sssss 


कैक आल्या साथी इथं 
भिती नव्हतीच  कुणा 
हाक ऐक या जगाची 
आल्या पाऊली  तू जा ना !


तुझ्या येण्याने येण्याने 
मनशांती ही मिळेना 
स्वास्थ्य बिघडून गेले 
कोरोना आता तू जा ना .


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


©राष्ट्रपाल भा .सावंत 
9403144356
सदर काव्य हे जनजागृतीसाठी आहे.काव्यात फेरफार करुन फॉरवर्ड करू नये  🙏🏻कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता प्रशासनाला आणि एकमेकास सहकार्य करा 🙏🏻स्वतः सह इतरांचीही काळजी घ्या 🙏🏻🙏🏻


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image