पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार कोव्हिड योद्धा कै.शिवाजीराव नामदेव मारकड कोरोनाशी लढताना शहिद ..

 


पुणे - दॊंड/लोकनिर्माण (विनायक दोरगे)


           
      पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार कै. शिवाजीराव नामदेव मारकड हे यवत पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना काही दिवसापूर्वी कोरणा पॉझिटिव्ह असल्याकारणाने दवाखान्यामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यादरम्यान दिनांक २७ रोजी कोरोणाशी लढताना आज त्यांची प्राणज्योत मालवली.
     पुणे ग्रामीण दलामध्ये काम करत असताना हवालदार कै.मारकड साहेब हे खूपच मनमिळावू स्वभावाचे असल्याचे त्यांचे सहकारी दुःख व्यक्त करताना सांगत होते. नेहमी हसतमुख व सहकार्याची भावना असणारे कै.मार्कड साहेब आपल्यातून  गेले आहेत यावर अजूनही आमचा  विश्वास बसत नसल्याचे त्याचे  सहकारी सांगत होते.
 यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भाऊसाहेब पाटील यांनी अखेरची श्रद्धांजली वाहत असताना दुःख व्यक्त करत सांगितले की कै.मारकड यांच्या जाण्याने आमच्या यवत पोलीस स्टेशन परिवारावरातील  सदस्य अचानक गेल्याने आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
       कै.मारकड यांची अजुन किमान तीन वर्ष पोलिस दलातील सेवा शिल्लक होती .. नेहमीच हसतमुख शांत स्वभाव असणारे कै.मारकड साहेब यांचे अचानक जाणे हे मनाला चटका लावून जाणारे आहे यवत पोलीस स्टेशन व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लोकनिर्माण वृत्तपत्र  परिवाराकडून कोव्हिड योद्धा शहिद कै शिवाजीराव मारकड यांना अखेरची भावपुर्ण श्रद्धांजली!


 


 


 


 


 


पत्रकार - श्री विनायक दोरगे


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image