उत्तर महाराष्ट्र ग्रामसाहित्यिक अलका सानप यांना भारतीय दलित साहित्य अकादमीचा "सावित्रीबाई फुले राष्ट्रीय फॅलोशिप २०२० " सर्वोच्च पुरस्कार नवी दिल्लीत जाहीर !

         


मुंबई /लोकनिर्माण (लक्ष्मण राजे)


   बृहन्मुंबईत स्थायिक,मूळ शेतकरी कन्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सोनारी गाव(कोलपेवाडी जवळ) येथील शेतकरी कारभारी सांगळे यांची सुकन्या अलका गोदाकाठ संस्कृतीत लहानाशी मोठी झालेली भावस्पर्शी कवयित्री-लेखिका अलका हिचा गुणांची कदर करुन मायमाऊली गुरुवर्य आदर्श शिक्षिका स्व.सुमनताई तथा सुमती त्र्यंबक उगलमुगले यांनी आपुलकीच्या भावनेतून अलका सानप यांना बृहन्मुंबई ग्रॅंटरोड पश्चिम शेरिची वाडी येथे आणून अध्यापन शिक्षण पूर्ण करून त्यांचा सोन्याचा संसार उभा केला.सौ.अलका विकास सानप हे चतुरस्त्र साहित्यिक लेखिका, कवयित्री असं व्यक्तिमत्व घडवलं.सौ.अलका सानप यांनी गुरूवर्य सुमती त्र्यंबक उगलमुगले ताईचें जीवन चरित्र ग्रंथाचे लेखन केले आहे. हा चरित्र ग्रंथ आता प्रकाशनाच्या वाटेवर असून पुस्तकांच्या विश्वात या चरित्र ग्रंथाचे लवकरच आगमन होईल. तसेच संपूर्ण भारतात लोकप्रिय अशा आदरणीय डॉ.एस.पि सुमनाक्षर यांच्या भारतीय दलित साहित्य अकादमीचा सर्वोच्च पुरस्कार" विरागंणा सावित्रीबाई फुले स्मृती फॅलोशिप २०२० या राष्ट्रीय पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्य स्तरावर अलका विकास सानप यांची निवड केली आहे. याविषयीचे अधिकृत पत्र अलका सानप यांना पाठवून २४आणि२५डिंसेंबर २०२० रोजी नवी दिल्लीत इंदिरा गांधी, (तालकोटारा इण्डोर स्टेडियमवर) येथे होणाऱ्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात पुरस्कार विजेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याने अलका विकास सानप यांच्या वर चौफेर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच अलका सानप यांचे सासर संगमनेर तालुक्यातील सोनशी या निमोण तळेगाव पंचक्रोशीतील गावकरी व कोपरगाव तालुक्यातील सोनशी या गाव कोलपेवाडी पंचक्रोशीतील गावकरी आणि मुंबईतील आप्तजण यांनी अभिनंदन केले आहे. भावस्पर्शी कवयित्री-लेखिका अलका विकास सानप यांच्या साहित्यकृती आणि शेतकरी कन्या भूषणावह आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी तसेच सामाजिक , शैक्षणिक ,सांस्कृतिक ,साहित्य क्षेत्रातील , अनेक मान्यवरांनी त्यांना मनःपुर्वक हार्दिक अभिनंदनीय शुभेच्छा दिल्या आहेत.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image