बॉलीवूड ड्रग्स कनेक्शन - अॅडवोकेट प्रकाश साळशिंगीकर,  फौजदारी वकील, मुंबई

 


         


बॉलीवूड ड्रग्स कनेक्शन
     १४जून२०२०रोजी कोणी विचारही केला नसेल की, सुशांतसिंग राजपूत च्या मृत्यूनंतर ज्या काही घटना घडतील त्यामुळे समस्त बॉलीवूड जगत हादरून जाईल. सुशांतच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तडकाफडकी त्याने आत्महत्या केली असे घोषित केल्याच्या काही दिवसानंतर लोकशाहीच्या स्तंभापैकी एक महत्त्वाचा घटक असलेल्या मीडियाने या प्रकरणातील बऱ्याच लहान-सहान गोष्टीवर प्रकाश टाकून सुशांतचा मृत्यू होणे यामागे बरेच विषय दडलेले असू शकतात असे समाजा समोर आणले. त्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांनी केलेली तक्रार, बिहारच्या पोलीस पथकाला मुंबईत मिळालेली वागणूक, बिहार व महाराष्ट्र राज्य यांच्यामध्ये या प्रकरणावरून झालेली शाब्दिक चकमक, बिहार सरकारकडून सीबीआय ला केस देणे व सीबीआय कडून या केसमध्ये तपास करण्यात यावा असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे सर्व घडामोडींच्या वेळीसुद्धा कुणाला वाटले नसेल की सुशांतच्या आत्महत्ये पासून सुरू झालेली बाब ही बॉलीवूड चे ड्रग्स कनेक्शन चव्हाट्यावर आणणारी ठरेल. याआधी बॉलीवूड आणि ड्रग्स कनेक्शन या बाबी कुणालाही नवीन नव्हत्या संजय दत्त, फरदीन खान अशा अनेक कलाकारांसोबत हा विषय येऊन गेलेला आपण पाहिला व ऐकला आहे. 
बॉलीवूडची झगमगाटीची आकर्षक दुनिया व तेथील सेलिब्रिटी बाबत सामान्य माणसाच्या मनात असलेले आकर्षण हे आपणा सर्वांना माहित आहे. सेलिब्रिटींची जीवनशैली त्यांचे डिझायनर आऊटफिट, सोशल मीडिया पोस्ट, ट्विटर चे ट्विट्स हे सर्वकाही इतके मनमोहक असतात की कोणालाही त्याची सहज भुरळ पडावी. पण या रील लाइफ मागे त्यांची रियल लाइफ काय आहे हे फार काही कुणास ठाऊक नसते. ज्यावेळी नवीन व्यक्ती बॉलीवूड मध्ये प्रवेश करते त्यावेळी येथील वेगवेगळ्या होणाऱ्या पार्ट्या व त्या पार्ट्यांमध्ये होणारे प्रकार बघून त्या व्यक्तीला असे वाटू शकते की, बॉलीवूड मध्ये अशीच संस्कृती आहे व जर आपण याचा स्वीकार नाही केला तर आपण याच्या बाहेर फेकले जाऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला उत्सुकतेपोटी व त्यानंतर आम्ही कोणापेक्षा कमी नाही हे दाखवण्यासाठी अशी व्यक्ती प्रतिबंधित असलेल्या ड्रग चे सेवन करू शकते. जनता जनार्दन ही रातोरात कोणालाही डोक्यावर बसवते व डोक्यावरून फेकून सुद्धा देते अशा रातोरात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीला मिळालेल्या पैसा ग्लॅमर प्रसिद्धीची एक प्रकारे सवय लागून जाते.  यशाच्या शिखरावर जाणे जितके कठीण आहे त्यापेक्षा कठीण तेथे टिकून राहणे असल्यामुळे कालांतराने अशा सेलिब्रिटीजला जी काही ग्‍लॅमरस लाईफची सवय लागलेली असते ती लाइफ न मिळाल्यामुळे बरेच जण नशेच्या गर्तेत ओढले जातात व त्यातून त्यांना स्वतःला बाहेर काढणे कठीण होऊन जाते. अनेक कलाकारांनी स्वतःला या सर्व प्रकारापासून पूर्णता वेगळे ठेवलेले आहे. काही जण योग्य ती ट्रीटमेंट घेऊन व्यसन मुक्त झालेले सुद्धा आपणास माहित आहे तसेच काही कलाकारांच्या करिअरचा किंवा आयुष्याचा अंत सुद्धा व्यसनाने झालेला आपणास माहित आहे.
वर्षानुवर्षे आपण सुद्धा बॉलीवुड मधील लोक असे करत असता असे म्हणून याकडे दुर्लक्ष करीत आलेलो आहे व ही संस्कृतीच तेथे कायम राखली गेली होती. रिया चक्रवर्तीला झालेल्या अटकेनंतर ज्या काही बाबी समोर आल्या त्यामधून मोठ-मोठ्या सिने तारकांची नावे समोर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ माजलेली आहे. या सर्व ड्रग्स च्या प्रकारात अद्यापपावेतो वीस-पंचवीस जणांना अटक झाली असून येत्या काळात अनेकांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपास यंत्रणा आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कायदा आपले काही बिघडवू शकत नाही अशा अविर्भावात असलेल्या अनेकांना नक्कीच एनसीबी ने केलेल्या गेल्या आठवड्यातील कारवाईमुळे धक्का बसला असेल. या सर्व व बाहेर येत असलेल्या प्रकरणांवरून वरून सामान्य माणसांच्या मनात एक आशा निर्माण झाली आहे की बॉलीवूड मधून ड्रग्स चा न्यायनाट होण्याची वेळ आली आहे. येत्या काळात ड्रग्स वरून बॉलीवूड मधील कलाकारांची असलेली काळी संपत्ती, करचुकवेगिरी, गुन्हेगारी जगताशी असलेले संबंध, अनेकांचे झालेले लैंगिक शोषण या दिशेने तपासाची सुई गेल्यास त्यात नवल नसावे.


अॅडवोकेट प्रकाश साळशिंगीकर 
फौजदारी वकील, मुंबई.
9892010121


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image