भाजपच्या जिल्हा कार्यकरणीत धारावी मधील मराठी माणसाला स्थान नाही विधानसभा अध्यक्ष पदावर तरी मराठी ची वर्णी लागेल का ?

मुंबई/लोकनिर्माण (दत्ता खंदारे)
        नुकत्याच  झालेल्या भाजपच्या दक्षिण मध्य मुंबई च्या कार्यकरीणीत मराठी माणसाला स्थान दिले नाही.  एवढेच नव्हे तर गेल्या  २५ वर्षापासून  धारावी विधानसभा अध्यक्ष पदी मराठी माणसाला स्थान न दिल्यामुळे धारावीत १ टक्का सुद्धा मराठी पदाधिकारी आणि कार्यकर्ता उरला नाही.
आत्तापर्यत धारावीला मराठी विधानसभा अध्यक्ष दिला नाही म्हणून पदाधिकारी आणि कार्यकर्ते   भाजपला धारावीतील मराठी चे वावग आहे का? असा प्रश्न दबक्या आवाजात विचारत असून शिवाय धारावीत भाजप पक्ष मराठी विरोधी आहे असा समज पसरला गेला आहे.म्हणूनच धारावीमधील मराठी कार्यकर्ता भाजपला जोड़ला जात नाही.
अनेक मराठी कार्यकर्त्यांचा आवाज हा मराठी विधानसभा अध्यक्ष व्हावा हिच इच्छा आहे.
     २०२२ च्या महानगर पालिका च्या निवडणुकी चा विचार करता मराठी व्यक्ति  विधानसभा अध्यक्ष होण गरजेच आहे आणि भाजपला मराठी विरोधी नाही हे दाखवणे गरजेचे आहे
असे झाल्यास धारावीतील  3 वार्डमध्ये भाजप निश्चित विजय संपादन करील असे कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो. 
आता खरच भाजप या महाराष्ट्रातील मराठी माणसाला धारावी विधानसभा अध्यक्षपदी  बसवून न्याय देईल का?


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image